श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत
श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

sakal_logo
By

51961
श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा
कोल्हापूर ः श्री कपिलेश्वर पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगलधाम ब्राह्मण सभा येथे खेळीमेळीत झाली. अध्यक्ष कमलाकर बुरांडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. माजी संचालक मोहन लळीत, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विषयपत्रिका व अहवालवाचन व्यवस्थापक सुनील वेळापूरकर यांनी केले. राजन झुरळे, चंद्रकांत मोडक, जनार्दन जोशी या सभासदांनी प्रश्न विचारले. सभेमध्ये सर्व विषय एकमताने मंजूर झाले. दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांचे गडकोटांचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी संस्थापक संचालक पांडुरंग यज्ञोपवीत, उपाध्यक्षा समृद्धी सरदार, संचालक नंदकुमार सूर्यवंशी, संजय पाटील, सुहास मोडक, माधव पाटील, गजानन नार्वेकर, कृष्णात पोवार, ॲड. चंद्रशेखर कुलकर्णी, गणपती सूर्यवंशी उपस्थित होते. ॲड. आसावरी कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98812 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..