जे. पी. नाईक पतसंस्थेतर्फे अकरा टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जे. पी. नाईक पतसंस्थेतर्फे अकरा टक्के लाभांश
जे. पी. नाईक पतसंस्थेतर्फे अकरा टक्के लाभांश

जे. पी. नाईक पतसंस्थेतर्फे अकरा टक्के लाभांश

sakal_logo
By

51962
आजरा : पंच्याहत्तरी पूर्ण झालेले सभासद बसाप्पा आरबोळे यांचा सत्कार करताना प्रा. डॉ. शिवशंकर उपासे. या वेळी उपस्थित मान्यवर.

जे. पी. नाईक पतसंस्थेतर्फे
अकरा टक्के लाभांश
आजरा, ता. २३ : सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी दिली.
येथील शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण अधिकारी एस. एस. देसाई यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. आर. एम. आय. सी. आय. सी. आय. बॅंकेचे सीताराम चव्हाण यांनी सभासदांना पे-डायरेक्ट कार्डविषयी (एटीएम) माहिती दिली.
डॉ. जे. पी. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक व मान्यवरांच्या हस्ते झाले. के. व्ही. येसणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभासद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. व्यवस्थापक संतोष जाधव यांनी अहवाल वाचन केले. डॉ. उपासे यांनी मागील वर्षीच्या अहवालाचे वाचन केले. शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणीचे वाचन केले. शीतल हरेर यांनी संचालक मंडळ येणे कर्ज यादीचे वाचन केले. या वेळी झालेल्या चर्चेत गजानन चिगरे, सुनील चव्हाण, रवींद्र येसादे, सुधाकर वंजारे, पांडुरंग शिपूरकर यांनी सहभाग घेतला. सुभाष विभुते यांनी सूत्रसंचालन केले. सीमा चव्हाण यांनी आभार मानले. संजय तेजम, निकीता स्वामी, नितीन लकमले, सुभाष पाटील, तुषार येरुडकर, जोतिबा आजगेकर, प्रसाद ओतारी व सचिन पोवार यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98830 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..