लम्पी फॉलोअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पी फॉलोअप
लम्पी फॉलोअप

लम्पी फॉलोअप

sakal_logo
By

जिल्ह्यात लम्पीमुळे
चार जनावरे दगावली
तीव्रता कायम; लसीकरण मोहीम गतीने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः लम्पी त्वचा विकाराची तीव्रता कायम असून जिल्ह्यात आज दिवसभरात ३१ जनावरांना बाधा झाली. तर ४ जनावरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या ३३ वर पोहचली आहे. आजवर एकूण ७१२ जनावरांना लागण झाली आहे. यातील २२० जनावरे रोगमुक्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरांना लम्पीची लक्षणे दिसत आहेत. आज मृत्यू झालेल्या जनावरांत अब्दुललाट येथील दोन, तर कोडोलीतील दोन जनावरांचा समावेश आहे. लम्पी नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने दोन लाख २१ हजार जनावरांना लसीकरण केले. यातून रोग लागण होण्याचे प्रमाण ०.२५ टक्के आहे. रोग बरा होण्याचे प्रमाण ३२ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण ४.६६ टक्के आहे. त्यामुळे जेथील जनावरांना लम्पीची लक्षणे दिसतात, अशा जनावर मालकांनी लम्पीच्या जनावरांना सोडून न देता उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय पशुवैद्यक करीत आहेत.
हातकणगंले, पन्हाळा, शिरोळ तालुक्यातील सात गावांत जनावरांना लम्पीची लागण ठळक दिसत आहे. लसीकरण, निदान व उपचारसेवा प्रभावी सुरू आहे. शासनाने दिलेल्या लस व औषधांचा वापर सुरू आहे. त्यामुळे जिथे लम्पीची लक्षणे दिसताच अशा जनावरांना अन्य जनावरांपासून दूर बांधावे, तसेच तातडीने शासकीय पशू वैद्याकडून बाधित जनावरांना उपचार करून घ्यावेत.



.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98893 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..