गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

51998
गडहिंग्लज : कित्तूरकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करताना डॉ. सतीश घाळी. शेजारी सुनील चौगुले, अरविंद कित्तूरकर आदी.

कित्तूरकर महाविद्यालयात संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात नवागतांचे स्वागत व बारावीतील गुणवंतांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. या वेळी नेत्रदात्याच्या नातेवाईकांचा सत्कार करीत अवयवदानाचा संदेश देण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. हिरण्यकेशी फौंडेशनचे अध्यक्ष सुनील चौगुले, डॉ. एस. व्ही. भांबर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य विजय चौगुले यांनी स्वागत केले. इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील नेत्रदात्या इंदुताई पाटील यांच्या नातेवाईकांचा सत्कार झाला. चौगुले यांनी शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करुन अभ्यासक्रम निवडण्याचा सल्ला दिला. डॉ. घाळी यांनी अवांतर वाचनाचे आवाहन केले. उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, डॉ. मंगलकुमार पाटील, उपप्राचार्या अनिता चौगुले आदी उपस्थित होते. श्वेता दड्डी यांनी आभार मानले.
-----------------
51999
गिजवणे : विठ्ठल सेवा संस्थेच्या वार्षिक सभेत संतोष पाटील यांचा सत्कार करताना बाबासाहेब पाटील. शेजारी संस्थेचे पदाधिकारी.

विठ्ठल संस्थेची सभा उत्साहात
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील श्री विठ्ठल विकास सेवा संस्थेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक अॅड. शांतिनाथ पाटील यांनी स्वागत केले. ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब ऊर्फ सखगोंडा पाटील यांचा पंच्चाहत्तरीनिमित्त, तर कृष्णा मोहिते यांचा शंभरीनिमित्त संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार झाला. अशोक मोहिते यांचा विशेष सत्कार झाला. सचिव मारुती मस्कर यांनी अहवाल वाचन केले. बाबासाहेब पाटील यांनी सभासदाना ११ टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले. उपाध्यक्ष राजाराम कडूकर, रामगोंडा काळे, अशोक पाटील, विराप्पा दळवी, विनायक पाटील, सुरेश देसुरे, सुरेश चव्हाण, सिदगोंडा पाटील, सुरेश कडूकर, अमोल कांबळे, रमेश नाईक, सुभाष कुंभार, अश्विनी काळे, शिवाजी पाडले, विजय पाटील, विनोद पाटील, अरविंद पोडजाळे, जोतिबा काळे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. एम. बी. दळवी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुनंदा पोडजाळे यांनी आभार मानले.
-----------------
52000
कौलगे : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाककृती प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना रंजना केसरकर. शेजारी एस. एस. इनामदार, स्वाती पाटील, सुरेखा नंदनवाडे.

कौलगे शाळेत पाककृती प्रदर्शन
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पाककृती प्रदर्शन झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते दहावीचे ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. रंजना केसरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. मुख्याध्यापिका एस. एस. इनामदार यांच्या हस्ते केसरकर यांचा सत्कार झाला. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी खोबऱ्याची बर्फी, ढोकळा, इडली, मसालेभात, आंबोळी, केक, अप्पे, धपाटे, खीर, भडंग, पिझ्झा, गुलाब जामुन यासह विविध पदार्थांची मांडणी केली होती. शालेय पोषण आहारप्रमुख नामदेव यादव यांनी नियोजन केले. स्वाती पाटील, सुनील माने, बळीराम पाटील, दीपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, विश्‍वजीत चव्हाण, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98921 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..