संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

उषाराजे हायस्कूलमध्ये विज्ञान मेळावा
कोल्हापूर ः शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व ताराराणी विद्यापीठाचे उषाराजे हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विज्ञान मेळावा झाला. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण होते. तालुकास्तरीय यशस्वी स्पर्धकांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून वैविध्यपूर्ण मांडणी, सादरीकरण केले. यातून विभागिय स्तरावरील मेळाव्यासाठी जनतारा विद्यामंदिर व आ. न. नांद्रेकर ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूरची विद्यार्थिनी सई पाटील व तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी, वारणानगरची विद्यार्थिनी अर्पिता कुंभार यांची निवड झाली. भिमराव नलगुंडे, श्रीशैल मठपती, प्राजक्ता पाटील, सागर चुडाप्पा, सुवर्णा जाधव, प्रदिपकुमार निकम यांनी परीक्षण केले. डॉ. आझाद नायकवडी यांनी सादर केलेल्या पाणी संवर्धन प्रबोधन गीताने मेळाव्याची सुरवात झाली. यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, उपशिक्षणाधिकारी व्ही. एस. ओतारी, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, मुख्याध्यापिका एस. डी. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. डी. जमेनिस उपस्थित होते.
----------
विद्यामंदिर हणबरवाडीचे यश
कोल्हापूरः एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या मंदिर हणबरवाडी (ता. करवीर) या शाळेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. नियती लव्हटे, स्मिता खोत, समीक्षा खोत यांना प्रत्येकी ४८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळाली, तर सारथी संस्थेमार्फत राजनंदिनी वाडकर, श्रृती ढेरे व गायत्री वाडकर यांना प्रत्येकी ३८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळाली. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका निलोफर अत्तार यांचे मार्गदर्शन मिळाले. मुख्याध्यापक सुर्यकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
-----------
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची आज सभा
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २४) आयोजित केली आहे. मंगलधाम कार्यालयात दुपारी दोन वाजता ही सभा होईल, या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष हिंदूराव पाटील व कार्यवाह नंदकुमार रामाणे यांनी केले.
----------
‘सानेगुरूजी शिक्षक सहकारी’ची सभा
कोल्हापूर ः साने गुरूजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्ष डॉ. मिलींद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विषयांचे वाचन सचिव रमेश चौगुले यांनी केले. विषय पत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष डॉ. मिलींद गायकवाड, उपाध्यक्ष विश्वास जुवेकर, संचालक प्रकाश आमते, अभिजीत पाटील, विक्रमसिंह मुळीक, विलास कवडे यांनी उत्तरे दिली. विलास सुर्यवंशी, भारत निकम, जितेंद्र कानकेकर, संतोष डावरे, विलास जाधव, नाना कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, सुनंदा पाटील, राजेंद्र मगदूम, धनंजय रोटे, सोमनाथ जाधव, गणेश हाळवणकर, सुभाष गुळवणी, अश्विनी साळोखे, सुधा जरग, विलास कवडे, संजय मोरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98927 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..