सूतभेसळीचे प्रमाण समजणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूतभेसळीचे प्रमाण समजणार
सूतभेसळीचे प्रमाण समजणार

सूतभेसळीचे प्रमाण समजणार

sakal_logo
By

सूतभेसळीचे प्रमाण समजणार
---
यार्न असोसिएशनचे सूतगिरण्यांना निवेदन; यंत्रमागधारकांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम
इचलकरंजी, ता. २३ ः सूतभेसळ प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्यावर यार्न मर्चंट असोसिएशनने नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी एक निवेदन सर्व सूतगिरण्यांना पाठविले असून, सूती धाग्यात वापरलेल्या विस्कोसच्या प्रमाणाचा उल्लेख करण्याची सूचना केली. यामुळे वादविवाद टाळण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पुढील काळात यंत्रमागधारकांना १०० टक्के शुद्ध सूत खरेदी करता येणार असून, यात होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल.
कापसाचे दर वाढल्याने सूतगिरण्यांना फटका बसला आहे. त्यावर पर्याय म्हणून सूती धाग्यात विस्कोस (मानवनिर्मित धागे) याचा वापर करण्यात आला. साधारणपणे हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, प्रत्यक्षात अशा भेसळ केलेल्या सूतापासून तयार केलेल्या कापडावर प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत. प्रक्रिया करताना विस्कोसचे धागे दिसून येत असल्याने कापड व्यापारी व यंत्रमागधारक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. याचा आर्थिक फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनीही वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यामुळे हा प्रश्न यंत्रमाग उद्योगात कमालीचा तापला होता.
या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारक जागृती संघटना व इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशननेही आक्रमक भूमिका घेतली होती. यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शंकर कालिका व अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेत सूत बाचक्यावर विस्कोस वापराचे प्रमाण नोंद करण्याची मागणी केली होती. याबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यांनी निवेदन तयार करून सर्व सूतगिरण्यांना पाठविले आहे. सूती धाग्यात किती टक्के विस्कोस अथवा अन्य मानवनिर्मित धाग्यांचा वापर केला, त्याच्या टक्केवारीचा उल्लेख बाचक्यावर करावा, अशी मागणी केली आहे. याबाबतची कार्यवाही झाल्यास यंत्रमागधारकांना त्यांच्या गरजेनुसार सुताची खरेदी करता येईल. त्यामुळे पुढील काळात होणारे वाद-विवाद टाळता येणे शक्य असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
---------
सूतगिरण्यांच्या भूमिकेकडे लक्ष
कापूस दरात झालेली वाढ व सुताला मिळणारा कमी भाव यामुळे सूतगिरण्यांकडून सुतात मानवनिर्मित धाग्यांचा वापर करण्यात आला. पण, त्याचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. पण, आता यंत्रमागधारकांसह सूत व्यापाऱ्यांनीही या प्रश्नी ठोस भूमिका घेतली. त्यामुळे सूतगिरण्यांची आता जबाबदारी वाढली. त्यांच्याकडून यंत्रमागधारकांना अडचणीत आणण्याच्या या प्रकाराविरोधात ठोस कृती करण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98935 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..