इचल ः नवमहाराष्ट्र सूतगिरणी सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः नवमहाराष्ट्र सूतगिरणी सभा
इचल ः नवमहाराष्ट्र सूतगिरणी सभा

इचल ः नवमहाराष्ट्र सूतगिरणी सभा

sakal_logo
By

52013
----------------
सौरऊर्जा प्रकल्प राबवणार
आमदार आवाडे ः नवमहाराष्ट्र सूतगिरणी वार्षिक सभा

इचलकरंजी, ता. २३ ः सूत उत्पादन करताना होणाऱ्‍या विजेच्या खर्चाचा विचार करता नजीकच्या काळात सौरऊर्जा प्रकल्प राबवून उत्पादन घेतले जाईल, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. साजणी (ता. हातकणंगले) येथील नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना दक्षिण भारत जैन सभेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन इंगवले व संचालक आनंदराव नेमिष्टे यांच्या हस्ते सत्कार केला. आमदार आवाडे यांना साखर उद्योगातील योगदानाबद्दल भारतीय शुगर संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व्हाईस चेअरमन मगदूम व ज्येष्ठ संचालक प्रकाश मोरे यांच्या हस्ते सत्कार केला. किशोरी आवाडे, स्वप्नील आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे, अनिल कुडचे, अहमद मुजावर, अभय काश्मिरे आदी उपस्थित होते. स्वागत व्हाईस चेअरमन राजू मगदूम यांनी, तर प्रास्ताविक चेअरमन चंद्रकांत इंगवले यांनी केले. अहवाल सालात संस्थेला ५४ लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वस्त्रोद्योगातील अडचणी वाढल्या असून शासनाने त्या सोडविण्यासाठी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग पिसे यांनी केले. आभार संचालक नेमिष्टे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98945 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..