यशस्वीतेसाठी व्यक्तीमत्व विकास घडवावा; प्रांताधिकारी वाघमोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशस्वीतेसाठी व्यक्तीमत्व विकास घडवावा; प्रांताधिकारी वाघमोडे
यशस्वीतेसाठी व्यक्तीमत्व विकास घडवावा; प्रांताधिकारी वाघमोडे

यशस्वीतेसाठी व्यक्तीमत्व विकास घडवावा; प्रांताधिकारी वाघमोडे

sakal_logo
By

52015
गडहिंग्लज : डॉ. जे. पी. नाईक शैक्षणिक व्यासपीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते स्वीकारताना जयश्री भुसुरी. शेजारी बाळेश नाईक व व्यासपीठाचे पदाधिकारी.

यशस्वीतेसाठी व्यक्तिमत्त्व विकास घडवा
---
प्रांताधिकारी वाघमोडे; डॉ. नाईक शैक्षणिक व्यासपीठतर्फे पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असली तरी केवळ न्यूनगंडामुळे ते मागे राहतात. यामुळे मनात भीती न बाळगता यशस्वी होण्यासाठी आचार, विचार बदलून आपला व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणावा, असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले.
पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक शैक्षणिक व्यासपीठतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक अध्यक्षस्थानी होते. डॉ. राधाकृष्णन पतसंस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठतर्फे बाळकृष्ण कदम, सुमन गवेकर, दिगंबर जाधव, जयश्री भुसुरी, अशोक गडदराम यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षणविस्तार अधिकारी रमेश कोरवी, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश कुंभार, उपाध्यक्ष जनार्दन पाटील व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्रीधर पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. या वेळी विविध पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाही सत्कार पतसंस्थेतर्फे करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय निवड, क्रीडा स्पर्धा, दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. कृष्णा पाटील, दिनकर खवरे व राजेंद्र नाईक यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98948 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..