लम्पीमुळे मृत जनावरास एक लाख मदत द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीमुळे मृत जनावरास एक लाख मदत द्या
लम्पीमुळे मृत जनावरास एक लाख मदत द्या

लम्पीमुळे मृत जनावरास एक लाख मदत द्या

sakal_logo
By

52027
------------------
लम्पीमुळे मृत जनावरास एक लाख मदत द्या
युवा महाराष्ट्र सेनेतर्फे मागणी; बैलगाडीत प्रतीकात्मक मृत जनावर ठेऊन आंदोलन
इचलकरंजी, ता. २३ : शासनाने लम्पी संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या शेतकऱ्यांना प्रत्येक जनावरास एक लाख रुपये मदत जाहीर करावी. या मागणीसाठी युवा महाराष्ट्र सेनेतर्फे प्रतीकात्मक मृत जनावर बैलगाडीमध्ये ठेवून बैलगाडी ओढत प्रांत कार्यालयावर आणत निवेदन दिले. निवेदन शिरेस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले.
लम्पीमुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांस आर्थिक नुकसान होत आहे. राज्य सरकारने लम्पीमुळे मृत्यू झालेल्या दुधाच्या जनावरास ३० हजार, ओढकाम करणारे जनावर (बैल) २५ हजार, छोटी जनावरे यांना १६ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखी आहे. शासनाने शेतकऱ्यांची व्यथा समजून मृत्यू झालेल्या प्रती जनावारास एक लाख रुपये मदत जाहीर करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. सॅम आठवले, राहुल लोकरे, सचिन पाटील, तौसिफ इनामदार राजू दंडी, सतीश कवडे, आनंदा नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98960 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..