रेशन मोर्चा -कम्युनिस्ट पक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन मोर्चा -कम्युनिस्ट पक्ष
रेशन मोर्चा -कम्युनिस्ट पक्ष

रेशन मोर्चा -कम्युनिस्ट पक्ष

sakal_logo
By

52132


भाकपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
दसरा-दिवाळीला साखर, रवा, तेल, डाळी द्या; महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : ‘सोडणार नाही सोडणार नाही, रेशनचा हक्क सोडणार नाही,’ धान्य आणि इतर खाद्य पदार्थावरील जीएसटी रद्द करा, रद्द करा,‘चले जाव चले जाव, मोदी सरकार चले जाव, अशा घोषणा देत आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोणत्याही परिस्थितीत दसरा दिवाळीसाठी साखर, रवा, तेल, डाळींचा पुरवठा करा यांसह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढणला. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन दिले.
दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकातून मोर्चाला सुरवात केली. महिलांच्या घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला. तेथून त्या व्हिनस कॉर्नरवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी काही महिलांनी डोक्यावर रुमाल धरले होते. त्यांच्या घोषणांतून त्यांची पोटतिडीक दिसून येत होती. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यासमोर आला. मोजक्याच शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले.
प्राचार्य ए. बी. पाटील, अमोल नाईक, शिवाजी मगदूम, मुमताज हैदर, विकास पाटील, विवेकानंद गोडसे, अरुण मांजरे, आबासो चौगुले, सदा मलाबादे, आप्पा परीट, चंद्रकला मगदूम, उत्सला भोसले, राजेश वरक, दिनकर आदमापूर, संदेश जाधव, नारायण गायकवाड, आनंदराव चव्हाण, शिवगोंडा खोत, दत्ता माने, अनिता वड्ड यांच्यासह महिलांनी मोर्चात सहभाग घेतला होता.
-----
निवेदनातील मागण्या
-रेशनचा अधिकार कायम करा
-दोन, तीन, चारचाकी गरीब व्यावसायिक
कामगार आणि शेतकऱ्यांचे रेशन सुरू ठेवा
-शासन योजनेतून स्लॅबचे घर बांधले
असल्यास रेशन योजनेतून वगळू नये
-पात्र रेशनधारकांना रेशन मिळालेच पाहिजे
-२०१३ नंतरच्या सर्व रेशनकार्ड धारकांना
बाराअंकी नंबर आणि धान्य मिळेल याची व्यवस्था करा
-धान्य आणि इतर खाद्यपदार्थावरील जीएसटी रद्द करा
-रेशनसाठी बंधनकारक केलेली बायोमेट्रिक पद्धती रद्द करा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98964 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..