धान्य सोडण्याचा आदेश मागे घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धान्य सोडण्याचा आदेश मागे घ्या
धान्य सोडण्याचा आदेश मागे घ्या

धान्य सोडण्याचा आदेश मागे घ्या

sakal_logo
By

52053
------------
धान्य सोडण्याचा आदेश मागे घ्या
इचलकरंजीत काँग्रेसतर्फे मागणी; पुरवठा कार्यालयासमोर निदर्शने
इचलकरंजी, ता. २३ : शिक्षापत्रिकेवरील धान्य सोडण्याबाबत शासनाने काढलेल्या आदेशाच्या निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील पुरवठा कार्यालयासमोर निदर्शने केली. रेशन बचाव गरीब बचाव, ई डी सरकार चले जावो, शिंदे, फडणवीस सरकार मुरदा बाद अशा घोषणा देत रेशनबाबतच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. धान्य सोडण्याबाबत काढलेल्या शासन परिपत्रकाची होळी केली. मागणीचे निवेदन पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांना दिले. आदेश मागे घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
देशातील सुमारे ८० कोटी नागरिकांना अत्यल्प दरात धान्य मिळावे यासाठीचा अन्न सुरक्षा कायदा यूपीए सरकारने २०१३ मध्ये लागू केला. त्याची अंमलबजावणी २०१४ मध्ये केली. मात्र, १ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे देशातील जनतेला हक्काच्या अन्न धान्यावरील हक्क सोडावा लागणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने रेशनिंगसाठी घातलेल्या जाचक अटी म्हणजे एकूणच रेशन व्यवस्था बंद करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा डाव आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, युवक अध्यक्ष प्रमोद खुडे, बाबासाहेब कोतवाल, बिस्मिल्ला गैबान, समीर शिरगावे, हारूण खलिफा, विजय मुसळे, रवी वासुदेव, सुनीता चौगुले, मधु म्हेतर, महानंदा हिरेमठ, सचिन साठे आदी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98987 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..