कोवाड परिसरात भाजीपाला उत्पादनास वाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड परिसरात भाजीपाला उत्पादनास वाव
कोवाड परिसरात भाजीपाला उत्पादनास वाव

कोवाड परिसरात भाजीपाला उत्पादनास वाव

sakal_logo
By

52061
कोवाड : येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी थाटलेले दुकान.

कोवाड परिसरात भाजीपाला उत्पादनास वाव
पोषक वातावरणासह बाजारपेठ उपलब्ध; सध्या मदार बाहेरून आलेल्या मालावरच
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २३ : भाजीपाल्याला कोवाड बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण स्थानिक परिसरात भाजीपाल्याचे उत्पादन कमी असल्याने बाहेरून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी येथे येतो आहे. यावरच सध्या पेठेची मदार आहे. येथील भाजीपाल्याची मागणी आणि भाजीपाला उत्पादनाला परिसरातील पोषक वातावरण या जमेच्या बाजू आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास वाव आहे.
कोवाड बाजारपेठ ही परिसरातील २० ते २५ खेड्यांची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची दररोज गर्दी असते. बाजारपेठेत इतर वस्तूंसह भाजीपाल्याला विशेष मागणी असते. दर गुरुवारी येथे आठवडी बाजार भरतो. बाजारादिवशी भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळते. पण भाजी विक्रेत्यांची संख्या मोजकी असल्याने ग्राहकांची अडचण होते. हा भाजीपाला बेळगांव व कर्नाटकातील वेळवेगळ्या ठिकाणाहून येतो. स्थानिक परिसरात भाजीपाला उत्पादन कमी असल्याने भाजी विक्रेत्यांना बाहेरुन भाजीपाला खरेदी करुन येथे विक्रीसाठी आणावा लागतो.
बाजारपेठेतील भाजीपाल्यासाठी असलेली मागणी विचारात घेता स्थानिक परिसरात भाजीपाला उत्पादनाला वाव आहे. भाजीपाल्याच्या वाढत्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनावर भर दिल्यास उत्पन्नाचा चांगला मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार ताम्रपर्णी नदीला बारमाही पाणी असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाला महत्त्व दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पण स्थानिक परिसरात ऊस व भाताचे क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाकडे दुर्लक्ष केले आहे. अलीकडे उसावर हुमणीचा शिरकाव झाल्याने शेतकरी अन्य पिकांच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी भाजीपाला हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो, असे शेती तज्‍ज्ञांचे मत आहे. स्थानिक परिसरातून भाजीपाला उपलब्ध झाल्यास भाजीविक्रेत्यांनाही कमी किमतीत भाजीपाला उपलब्ध होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या खर्चात व वेळेतही बचत होऊन ग्राहकांना योग्य दरात भाजीपाला मिळू शकतो. वांगी, टोमॅटो, दोडके, भोपळा, भेंडी, कांदा, आलू, कोबी, बटाटे, पालक, मेथी, कोंथिंबीर, मूळा, मिरची व शेपू असा भाजीपाला स्थानिक परिसरात घेण्यासाठी पोषक वातावरण दिसते.
------------------
चौकट
मोठ्या बाजारपेठा...
कोवाड परिसरात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मुबलक पाणीसाठा आहे. भाजीपाला घेण्यासाठी योग्य जमीन आहे. त्यामुळे ऊस, भात या पिकास भाजीपाला उत्पादनाकडे शेतकरी वळला, तर भाजीपाला विक्रीसाठी कोवाड, माणगांव, तुर्केवाडी, दड्डी, माणगांव व अडकूर अशा मोठ्या बाजारपेठा मिळू शकतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98999 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..