खराब स्कूल बॅग ‘बॅक टू पालिका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खराब स्कूल बॅग ‘बॅक टू पालिका’
खराब स्कूल बॅग ‘बॅक टू पालिका’

खराब स्कूल बॅग ‘बॅक टू पालिका’

sakal_logo
By

52068
गडहिंग्लज : पालिका कार्यालयातील एका कक्षात ठेवलेल्या खराब झालेल्या स्कूलबॅगा.

खराब स्कूलबॅगा ‘बॅक टू पालिका’
---
गडहिंग्लजमधील शाळांतील प्रकार; बॅगा बदलून देण्याची कार्यवाही सुरू
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : येथील पालिकेकडून दरवर्षी शिक्षण मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगा दिल्या जातात. यंदा या बॅगा प्रशासनाने शासनाच्या जीएम पोर्टलवरून मागविल्या असून, काही बॅगा खराब निघत आहेत. त्याच्या दर्जाविषयी चिंता व्यक्त करून विद्यार्थी-पालक त्या शाळेत परत देताहेत; तर शाळांकडून पुन्हा पालिकेकडे पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, खराब बॅगा बदलून देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
शहराच्या शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी पालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांसाठी पालिकेकडून स्कूलबॅगा, शूज, सॉक्स आदी साहित्याचे वितरण केले जाते. पालिकेत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असते, त्या वेळी स्थानिक किंवा बाहेरील एखाद्या खासगी व्यावसायिकाकडून बॅगांचा पुरवठा करून घेतला जात असे. त्याचे दर अधिक असले तरी दर्जाबाबत कधी तक्रार नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, सभागृहाची मुदत संपल्याने आता पालिकेवर प्रशासक आहेत. यंदा प्रशासनाने पालिकेच्या अंगणवाडीपासून सातवीपर्यंतच्या एक हजार २४५ विद्यार्थ्यांना स्कूलबॅगा, शूज व सॉक्स दिले. शासनाच्या जीएम पोर्टलवरून या साहित्याचा पुरवठा करून घेतला.
खासगी व्यावसायिकांपेक्षा या पोर्टलवरून खरेदी केलेले साहित्य स्वस्तात असले तरी त्याच्या दर्जाविषयी आता पालक शंका उपस्थित करताहेत. शिक्षण मंडळाच्या अंगणवाडी, बालवाडीसह सहा प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. परंतु, आता बॅगांचे बंद तुटणे, शिलाई निघण्यासह काही बॅगा फाटतही आहेत. यामुळे बॅगांच्या दर्जावर सवाल उठत आहे. एकीकडे, पालिका शाळांतील पटसंख्या वाढविण्याचे आवाहन केले जाते. दुसऱ्या बाजूला मात्र विद्यार्थ्यांना दिले जाणारे साहित्य असे खराब निघत असेल तर पटसंख्या वाढायची कशी, असा प्रश्‍न शिक्षक-पालक विचारत आहेत.

चौकट...
बिल आदा केलेले नाही
याबाबत मुख्याधिकारी खारगे म्हणाले, ‘‘सर्वच बॅगा खराब नाहीत. दहा ते बारा टक्के बॅगा खराब आहेत. अशा १५० बॅगा पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. शूज व सॉक्स चांगले आहेत. खराब बॅगा बदलून देण्यास संबंधित पोर्टलच्या यंत्रणेला कळविले आहे. नव्या बॅगा मिळत नाहीत, तोपर्यंत त्यांचे बिल आदा करणार नाही. शिवाय, त्यांची अनामत रक्कमही पालिकेकडे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99011 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..