गर्ल्स एनसीसी कॅडेटसना गडहिंग्लजला मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्ल्स एनसीसी कॅडेटसना गडहिंग्लजला मार्गदर्शन
गर्ल्स एनसीसी कॅडेटसना गडहिंग्लजला मार्गदर्शन

गर्ल्स एनसीसी कॅडेटसना गडहिंग्लजला मार्गदर्शन

sakal_logo
By

52091
गडहिंग्लज : साधना हायस्कूलच्या गर्ल्स एनसीसी बॅचला निरोपप्रसंगी डॉ. रुपा शहा, जे. बी. बारदेस्कर, जी. एस. शिंदे, गीता नातलेकर, वैशाली भिऊंगडे, उज्ज्वला दळवी आदी.

गर्ल्स एनसीसी कॅडेटसना मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील साधना हायस्कूलमधील गर्ल्स एनसीसीच्या दुसऱ्या बॅचला निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास कोल्हापूरच्या दिलासा सामाजिक संस्थेच्या प्रमुख व एनसीसीच्या मेजर प्रा. डॉ. रुपा शहा प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी त्यांनी एनसीसी कॅडेटसना मार्गदर्शन केले. प्राचार्य जी. एस. शिंदे, सचिव जे. बी. बारदेस्कर, उज्ज्वला दळवी, कॉमर्सच्या प्राचार्य वैशाली भिऊंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी साधना एनसीसी पथकाच्या सीटीओ गीता नातलेकर यांनी जिल्ह्यात कोल्हापूरनंतर एकमेव गडहिंग्लजमध्येच गर्ल्स एनसीसी बॅच सुरू असल्याचे सांगितले. या वेळी एनसीसी कॅडेटस सृष्टी पाटगावे, विश्रीती चौगुले, संयमी पाटील, दर्शना शहा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शहा यांनी एनसीसीचे आयुष्यातील महत्त्व, एनसीसीचे फायदे, आवश्यकता व गरज यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य शिंदे यांचेही भाषण झाले. प्राचार्य शिंदे, पर्यवेक्षक आर. एन. पटेल, संचालक अरविंद बारदेस्कर, एनसीसीच्या सीटीओ गीता नातलेकर यांनी संयोजन केले.
------------------
‘मविप’तर्फे चित्रकला, रांगोळी स्पर्धा
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व साधना कला महाविद्यालयातर्फे चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त या स्पर्धा होणार आहेत. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुल्या गटात या स्पर्धा होतील. भडगाव रोडवरील भाजी मंडईवरील गडहिंग्लज सायन्स सेंटरमध्ये ७ ऑक्टोबरला सकाळी दहा ते बारापर्यंत चित्रकला, तर दुपारी दोन ते पाचपर्यंत रांगोळी स्पर्धा होतील. इच्छूकांनी ३ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस. के. नेर्ले यांनी केले आहे.