परप्रातिंय गुन्हेगारांचा कोल्हापूरवर डोळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रातिंय गुन्हेगारांचा कोल्हापूरवर डोळा
परप्रातिंय गुन्हेगारांचा कोल्हापूरवर डोळा

परप्रातिंय गुन्हेगारांचा कोल्हापूरवर डोळा

sakal_logo
By

परप्रांतीय गुन्हेगारांचा कोल्हापूरवर डोळा
मोठा डल्ला मारण्याबरोबरच बस्तान बसविण्याचा प्रयत्न; पोलिसांसमोर आव्हान

राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः परप्रांतीय गुन्हेगार कोल्हापूरकडे मोर्चा वळवत आहेत. चोऱ्या, घरफोड्यांसह मोठा डल्ला मारण्याबरोबरच त्यांचा येथेच बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या वेळीच मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मुंबई, पुण्यानंतर प्रगतशील शहर म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. येथील भौगोलिक परिस्थिती अनेकांना आकर्षित करते. औद्योगिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे शहरासह जिल्ह्याचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्यांची आणि स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याला लागूनच कर्नाटक, गोवा राज्याचा सीमाभाग आहे. याच संधीचा फायदा उठविण्यासाठी परप्रांतीय गुन्हेगार कोल्हापूरकडे वळू लागले आहेत. मोठा डल्ला मारायचा आणि पसार व्हायचे, अगर कारवाईपासून वाचण्यासाठी कोल्हापुरात आश्रय घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. हे गेल्या महिन्याभरात पोलिसांनी केलेल्या कारवाईतूनच पुढे येत आहे.
सातारा येथे काही दिवसांपूर्वी खून करून केरळवासीय संशयित पसार झाला होता. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून जेरबंद केले होते. हरियाणा येथे गोळीबार करून एकाचा खून करून जिल्ह्यात आश्रयास आलेल्या टोळीतील पाच जणांना कागल पोलिसांनी ताब्यात घेतले. जवाहरनगर परिसरातील बंद घर फोडून स्थानिक नागरिकांवर दगडफेक करणाऱ्या मध्यप्रदेशमधील चौघांच्या टोळीच्या राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या. त्यापाठोपाठ जुना राजवाडा पोलिसांनी चांदी चोरणाऱ्या गुजरातच्या टोळीतील तिघांना पकडून दोन गुन्ह्यांची उकल केली. यावरून परप्रांतीय गुन्हेगार कोल्हापूरवर डोळा ठेवून असल्याचे स्पष्ट होते.
------------
चौकट
कारवाईसाठी हे अपेक्षित...
*घरमालकांना परप्रांतीय भाडेकरूची माहिती देणे बंधनकारक करावे
*रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या संपर्कात येणाऱ्यांवरही वॉच ठेवावा
*कारागृहातील परप्रांतीय गुन्हेगारांना स्वतंत्र ठेवावे
--
चौकट
जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचे स्वरूप
-------------------------------------------------------
प्रकार दाखल गुन्हे
२०१९ २०२० २०२१
---------------------------------------------------------
घरफोडी ३५६ २६७ २९२
चोऱ्या ९०३ ७५५ १४१४
-----------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99033 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..