भाजप युवा मोर्चातर्फे आजऱ्यात रक्तदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप युवा मोर्चातर्फे आजऱ्यात रक्तदान शिबीर
भाजप युवा मोर्चातर्फे आजऱ्यात रक्तदान शिबीर

भाजप युवा मोर्चातर्फे आजऱ्यात रक्तदान शिबीर

sakal_logo
By

52113
आजरा : येथील गंगामाई वाचन मंदिरात रक्तदान शिबिर उद्‍घाटनप्रसंगी मान्यवर.

भाजप युवा मोर्चातर्फे
आजऱ्यात रक्तदान शिबिर
आजरा, ता. २३ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आजरातर्फे रक्तदान शिबिर झाले. या वेळी ८० युवकांनी रक्तदान केले. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरू असून यानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. युवा मोर्चा आणि संजीवन ब्लड बॅंक कोल्हापूर यांच्यातर्फे गंगामाई वाचनमंदिर आजरा येथे रक्तदान शिबिर झाले.
या सेवा पंधरवड्यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता, वृक्षारोपण, मोदीच्या जीवनावर आधारित चित्रफित प्रदर्शन, खादी, व्होकल फॉर लोकल, पुस्तक प्रदर्शन, दिव्यांग वयोश्री कार्ड अशा जनसेवांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, नेते अरुण देसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, नगरसेवक आनंदा कुंभार, धनाजी पारपोलकर, नगरसेविका शुभदा जोशी यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले. युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष बेलवाडे, मुंबई महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष जी. एम. पाटील, आजरा अर्बन बॅंकेचे संचालक दीपक सातोस्कर, नाथ देसाई, अतिशकुमार देसाई, सुरेश कुंभार, पप्पू कुलकर्णी, संजय जोशी, जयवंत सुतार, संजय सांबरेकर, किरण केसकर, अजित हरेर, आर. आर. कालेकर, उदय सरदेसाई, बाबू संकपाळ, अभिजित इंजल, अभि केसरकर, विलास भादवणकर, हरिचंद्र भोगण, सदाशिव सुतार, मधुकर कुंभार, सुनील पाटील, धोंडिबा कवळीकट्टी, वैभव नार्वेकर, जयसिंग शेंदरकर, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99064 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..