महिला बॅंक सभासदांना 8 टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बॅंक सभासदांना 8 टक्के लाभांश
महिला बॅंक सभासदांना 8 टक्के लाभांश

महिला बॅंक सभासदांना 8 टक्के लाभांश

sakal_logo
By

महिला सहकारी बॅंकेतर्फे
8 टक्के लाभांशःसुर्यवंशी

कोल्हापूर, ता. 23 : कोल्हापूर महिला सहकारी बॅंकेच्या सभासदांना 8 टक्के लाभांश दिला जाणार असल्याची घोषणा अध्यक्षा शैलजा सुर्यवंशी यांनी केली. महिला बॅंकेची आज 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शाहू स्मारक भवन येथे झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
सौ. सुर्यवंशी म्हणाल्या, बॅंकेचे भाग भांडवल 4 कोटी 19 लाख, राखीव निधी 10 कोटी 44 लाख, ठेवी 95 कोटी 19 लाख, गुंतवणक 52 कोटी 96 लाख, कर्ज वाटप 51 कोटी 65 लाख रुपये केली आहेत. 62 लाख 16 हजार रुपये बॅंकेचा निव्वळ नफा आहे. बॅंकेला सातत्या अ ऑडिट वर्ग मिळत असून, सभासदाच्या हिताचे निर्णय घेवून बॅंक आपली प्रगती करत आहे. महाव्यवस्थापक जे. के. कुंभार यांनी नोटीस वाचन केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी दिली. गार्गी निंबाळकर यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तसेच 100 कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट्य पूर्ण करावे अशी मागणी केली. उपाध्यक्ष माधुरी शिंदे, संचालिका मनिषा दमामे, सुनिता डोंगळे, जानकी निंबाळकर, तिलोत्तमा भोसले, भारती डोंगळे, सुधा इंदुलकर, सुप्रिया पाटील, शुभांगी सुसिद्रन, मोहिनी घोटणे, मथुराबाई सुतार, जयश्री परमाळे, विजया जाधव, पूजा धर्माधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99079 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..