
प्रियदर्शिनी पतसंस्थेला ४० लाखांचा निव्वळ नफा
52139
गडहिंग्लज : प्रियदर्शिनी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना रुद्रगोंडा पाटील. व्यासपीठावर पतसंस्थेचे पदाधिकारी.
प्रियदर्शिनी पतसंस्थेला
४० लाखांचा निव्वळ नफा
गडहिंग्लज, ता. २३ : येथील प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. संस्थेचे अध्यक्ष रुद्रगोंडा पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेला आवश्यक तरतुदी करुन ४० लाख ३५ हजार रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांनी १२ टक्के लाभांश वाटपाच्या ठरावाला मंजूरी दिली.
सरव्यवस्थापक विश्वास देवाळे यांनी अहवाल वाचन केले. आर्थिक पत्रकांची त्यांनी माहिती दिली. डॉ. सीमा पाटणे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. संस्थापक अॅड. विश्वनाथ पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कन्यारत्न उत्कर्ष निधी, ज्येष्ठ नागरीक सभासद निधीबाबत माहिती दिली. नेसरी शाखेची कामगिरी उल्लेखनीय असून गारगोटी व कोल्हापूर शाखाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. उपविधी दुरुस्ती प्रस्तावाला सभासदांनी मंजूरी दिली. ७५ वर्षे पूर्ण केलेले सभासद, दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. उपाध्यक्ष शिवाजी गवळी, संचालक अरुण शहा, बाबासाहेब पाटील, डॉ. सदानंद पाटणे, आप्पासाहेब पाटील, डॉ. सुरेश संकेश्वरी यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालिका अंजली संकेश्वरी यांनी आभार मानले.