गजानन, अष्टविनायक संस्थेची वार्षिक सभा मुगळीत उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गजानन, अष्टविनायक संस्थेची वार्षिक सभा मुगळीत उत्साहात
गजानन, अष्टविनायक संस्थेची वार्षिक सभा मुगळीत उत्साहात

गजानन, अष्टविनायक संस्थेची वार्षिक सभा मुगळीत उत्साहात

sakal_logo
By

52140
मुगळी : गजानन व अष्टविनायक संस्थेच्या सभेत मंत्री कै. उमेश कत्ती यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी सोमगोंडा आरबोळे, बसवराज आजरी, राजशेखर यरटे व संस्थेचे पदाधिकारी.

गजानन, अष्टविनायक संस्थेची
वार्षिक सभा मुगळीत उत्साहात
नूल, ता. २५ : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील गजानन दूध संस्था व अष्टविनायक विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा संयुक्तरीत्या उत्साहात झाली. संस्थापक व हिराशुगर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कर्नाटकचे मंत्री कै. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रशांत महाडिक यांनी स्वागत केले. आपासो जाधव यांनी प्रास्तविक केले. राजशेखर यरटी व बसवराज आजरी यांचा सत्कार केला. गजानन दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव अण्णासाहेब चौगुले यांनी केले. जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या रावसाहेब चव्हाण, चंद्रकांत माने, गीता दुधाडे, सुरेश पाटील, राजू चौगुले यांचा भेटवस्तू देऊन सत्कार झाला. अष्टविनायक सेवा संस्थेचे अहवाल वाचन सचिव शिवानंद गड्डी यांनी केले. संस्थेला चालू वर्षी दोन लाख ३३ हजार ७५ रुपयांचा नफा झाल्याचे सांगण्यात आले. सोमगोडा आरबोळे, राजशेखर यरटी, बसवराज आजरी यांची भाषणे झाली. या वेळी निरंजन पाटील, निंगापा माने, शशिकांत भोसले, बसवराज आरबोळे, प्रशांत महाडिक, मल्लाप्पा घस्ती, आप्पासाहेब पाटील, दुंडापा पाटील यांच्यासह दोन्ही संस्थेचे संचालक, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. विवेकानंद स्वामी यांनी आभार मानले.