चिल्लर पार्टीतर्फे उद्या हॅचिको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिल्लर पार्टीतर्फे उद्या हॅचिको
चिल्लर पार्टीतर्फे उद्या हॅचिको

चिल्लर पार्टीतर्फे उद्या हॅचिको

sakal_logo
By

52163

चिल्लर पार्टीतर्फे उद्या
‘हॅचिको द डॉग स्टोरी’

कोल्हापूर, ता. २३ : साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्कार समारंभानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी (ता. २५) ‘हॅचिको द डॉग स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये चित्रपट दाखवला जाणार असून, कुत्रा आणि माणूस यांच्यातील प्रेमाची आणि भक्तीची कथा या सत्य घटनेवर आधारित चित्रपटात मांडणी केली आहे.
ट्रेनने प्रवास करताना संगीताचे प्राध्यापक पार्कर विल्सन यांना कुत्र्याचे एक गोंडस पिल्लू सापडते. त्याचा मालक कोण हे माहीत नसल्यामुळे रेल्वे स्टेशनवरून दोन आठवड्यांसाठी परवानगी घेऊन प्राध्यापक ते पिल्लू घरी घेऊन येतात. त्यांची पत्नी केट सुरुवातीला ते पिल्लू घरी ठेवून घेण्यास विरोध करते. मात्र, पुढे त्यांची मुलगी अँडी आणि तिचा भावी पती मायकेल यांच्या आग्रहाखातर त्याला घरी ठेवून घेण्यात येते, या मध्यवर्ती संकल्पनेवर चित्रपट बेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99153 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..