शिवसेना आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना आंदोलन
शिवसेना आंदोलन

शिवसेना आंदोलन

sakal_logo
By

५२१७०
बंद दाराआड मूर्तीची दुरुस्ती का केली?
शिवसेनेचा संतप्त सवाल; देवस्थान समितीवर आज काढणार मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीवर जनतेला विश्वासात न घेता एवढ्या तातडीने रासायनिक संवर्धन प्रक्रिया का केली, असा संतप्त सवाल आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे उपस्थित केला. यापूर्वीच्या प्रक्रियेवेळी सामान्य जनतेपासून विधानसभेपर्यंत चर्चा झाल्यानंतर निर्णय झाला; पण यावेळी बंद दरवाजाआड मूर्तीची तातडीची दुरुस्ती करण्याची वेळ का आली होती ? असाही सवाल करत त्यांनी नाईकवाडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जनतेला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रसंगी कोल्हापूर बंदचा इशारा दिला.
करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्र उत्सव असल्यामुळे मंदिर परिसरात स्वच्छतेचे काम सुरू आहे. याच दरम्यान दरवाजे बंद करून सीसीटीव्ही बंद ठेवून केवळ एका श्री पूजकाच्या सांगण्यावरून मूर्तीची दुरुस्ती केल्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी देवस्थान समितीमध्ये ठिय्या मारला. मूर्ती दुखावल्याचे कबूल करा, असा आग्रह सचिवांकडे धरला. सचिव नाईकवाडे यांनी मूर्तीला संवर्धनाची गरज असल्याने तातडीने काम केले, याबाबत पुजाऱ्यांकडून अर्ज आला होता, असा खुलासा केला; मात्र ही दुरुस्ती कोणत्या शास्त्रीय दृष्टीने केली, केंद्रीय पुरातत्त्व खात्याची परवानगी घेतली होती का, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नोटेशन का केले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने उद्या (शनिवारी) अकरा वाजता देवस्थान समितीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकरण इंगवले, सुनील मोदी, विशाल सूर्यवंशी, अवधूत साळोखे, अमित भोसले, संजय जाधव, सुनील जोशी, दिनेश साळोखे, राहुल माळी, धनाजी दळवी, दीपाली शिंदे, अभिजित बुकशेट, अशोक पाटील, दीपक गौड, वैभव जाधव, आदेश करंबे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99166 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..