वेडिंग उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेडिंग उत्सव
वेडिंग उत्सव

वेडिंग उत्सव

sakal_logo
By

52136

वेडिंग उत्सवातील कौशल्य परदेशातही पोहोचेल

संजय घोडावत ः एम्पातर्फे महासैनिक दरबार हॉलमध्ये प्रदर्शनास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः विवाह सोहळ्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा देणाऱ्या नानाविध संस्थांना एकाच छताखाली आणून इव्हेंट मॅनेजमेंट ॲँण्ड प्लॅनिग असोसिएशन (एम्पा) ने कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. अशा पद्धतीच्या प्रदर्शनातूनच विकास साधला जातो. प्रदर्शनात वेगवेगळ्या संकल्पनांची देवाणघेवाण होते. त्यामुळेच कोल्हापूरचे कौशल्य परदेशाततही नक्कीच नावाजले जाईल, असे संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी सांगितले. महासैनिक दरबार हॉलमध्ये एम्पातर्फे आज ‘वेडिंग उत्सव’ या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
एम्पाचे अध्यक्ष शाम बासराणी यांनी प्रदर्शनाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, ‘‘कोल्हापुरात पहिल्यांदाच विवाह सोहळ्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवांचे एकत्र प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. एकाच व्यासपीठावर हे सर्वजण आल्याने विवाह इच्छुकांसाठी विवाह सोहळ्याची तयारी सोपी होण्यास मदत होणार आहे. प्रदर्शनातील अनेक प्लॅनर्स देशभरातील विविध शहरांसह परदेशातही इव्हेंट मॅनेजमेंट करतात. हे इव्हेंट प्लॅनर्स मूळचे कोल्हापूरचे आहेत. त्याचीही माहिती या प्रदर्शनातून मिळेल.’’ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.
हॉटेल मालक संघाचे उज्वल नागेशकर, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे विजय हावळ, फोटोग्राफर्स अॅण्ड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे जगदीश गुरव, केटरर्स वेल्फेअर असोसिएशनचे महावीर सन्नके, सुशील चंदवाणी, सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव नरेश चंदवानी, गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे सुरेश आहुजा, कोल्हापूर सिंधी समाज ब्रिजलाल लालवाणी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार (ता. २५) पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.
दरम्यान, उद्‌घाटन सोहळ्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटमधील कोरिओग्राफर्सनी बहारदार नृत्याविष्कार सादर केले. एम्पाने घेतलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरविले. अमोल पाटील यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रदर्शनात लग्नासाठी अपेक्षित इव्हेंट मॅनेजमेंट व प्लॅनर्स, केटरर्स, फोटोग्राफर्स, हॉल व बँक्वेटस, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट, ज्वेलरी, ब्रायडल ड्रेसेस, ग्रुम वेअर्स आणि कोरिओग्राफर्स यांनी सहभाग घेतला आहे. यानिमित्ताने विवाह सोहळ्यासाठीचा संपूर्ण सेटअपच अवतरला आहे.

चौकट
‘वेडिंग संगीत’साठी कलाकारांकडून सादरीकरण
वेडिंग संगीतसाठी अनेक कलाकार, अँकर, गायक, डीजे, ढोल, नृत्यकलाकार प्रदर्शनादरम्यान आपली कला सादर करणार आहेत. प्रदर्शनातील सर्वच दिवस हे कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची संधी यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99169 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..