माता सुरक्षा अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माता सुरक्षा अभियान
माता सुरक्षा अभियान

माता सुरक्षा अभियान

sakal_logo
By

52189

नवरात्रोत्सवात मनपा आरोग्य विभागातर्फे
‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान

कोल्हापूर, ता. २३ : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षांवरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यालयात बैठक झाली. उपायुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव आदी उपस्थित होते.
गर्भधारणापूर्व आरोग्य सेवा, स्त्रीरोग निदान व उपचार, समुपदेशन, मधुमेह-रक्तदाब-कर्करोग पडताळणी व उपचार, क्षयरोग तसेच इतर संसर्गजन्य आजार तपासणी व उपचार जास्तीत जास्त महिलांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासक बलकवडे यांनी दिल्या. शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास योजना इत्यादी विभागांचा सहभाग असावा, असेही सांगितले. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग तसेच महिलांकरीता डोळ्यांचे आजार तपासणी शिबिर आयोजिन करण्याच्या सूचना आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव यांना दिल्या.
महापालिकेअंतर्गत नियमित लसीकरण, कृतिदल समिती बैठकही घेतली. लसीकरण अधिकारी डॉ. रूपाली यादव यांनी सविस्तर सादरीकरण केले. शहरामध्ये एकही गरोदर माता तसेच ५ वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील सर्व उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99184 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..