इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे चर्चासत्र
इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे चर्चासत्र

इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे चर्चासत्र

sakal_logo
By

52197

शैक्षणिक धोरणाचे यश अंमलबजावणीवर अवलंबून
डॉ. बी. एम. हिर्डेकर; इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे चर्चासत्र
कोल्हापूर, ता. २३ : ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्व क्षेत्रात लागू होते; मात्र या धोरणामध्ये मुलांच्या प्राथमिक बालसंगोपन शिक्षणावर भर दिला आहे. मुलांना शिकण्याचे स्वातंत्र्य दिले असून शिक्षण अधिकारी आणि अंमलबजावणीवर या धोरणाचे यश अवलंबून असेल. अनुदानित आणि विनअनुदानित भेदभाव न करता नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करता येईल,’’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले.
इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे (इम्सा) राम गणेश गडकरी हॉलमध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शाळेची भूमिका’ यावर चर्चासत्र, इम्सा इन्स्पायर्ड ॲवॉर्ड असा कार्यक्रम झाला. आमदार जयंत आसगावकर अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्राचार्य, शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते इम्सा इन्स्पायर्ड ॲवॉर्डने गौरविले.

डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘‘भाषा ही कोणाची मक्तेदारी नाही. विद्यार्थी जगातील कुठलीही भाषा सहकार्य, सहयोग, कनेक्टिव्हीटीच्या माध्यमातून शिकू शकतो. नव्या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुलांचं पोषण, आहार, वाढ, कौशल्य आदी घटकांवर या धोरणाचा प्रभाव पडेल. हे सगळं अर्थातच पालक, शिक्षकांच्या सहकार्यातून घडेल. शिक्षकांबरोबर मुलांचेही सबलीकरण घडेल. उच्च शिक्षणातील अनेक पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुले होऊ शकतील. तसेच शिक्षकांची जबाबदारी ठरवणारे हे धोरण आहे.’’
आमदार आसगावकर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांत धाडस निर्माण करण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व पाहिजे. यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा मोलाचा वाटा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्या सरकार दरबारी मांडून सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल.’’
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले, ‘‘कोरोना काळाचा जास्त परिणाम इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर झाला. पालक सध्या न्यायालयात धाव घेत आहेत. कायद्याचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी होत आहे. यासाठी शुल्क अधिनियमाचा अभ्यास सर्व शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक आहे.’’
प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, ‘इम्सा’चे अध्यक्ष गणेश नायकुडे, ‘क्रेडो’च्या सीईओ मृदुला श्रीधर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘क्रेडो’चे सहायक संचालक संजीवकुमार यांनी ‘क्रेडो’बद्दल माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी परिचय करून दिला. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, ‘इम्सा’चे सचिव नितीन पाटील, कार्याध्यक्ष के. डी. पाटील, संस्थापक महेश पोळ, उपाध्यक्ष एन. एम. काझी, खजिनदार एम. आर. पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, सचिन नाईक, अमर सरनाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99194 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..