जिल्हा बॅंकेची कुणकेश्‍वर शाखा फोडण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेची कुणकेश्‍वर
शाखा फोडण्याचा प्रयत्न
जिल्हा बॅंकेची कुणकेश्‍वर शाखा फोडण्याचा प्रयत्न

जिल्हा बॅंकेची कुणकेश्‍वर शाखा फोडण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

52198
कुणकेश्‍वर ः येथील जिल्हा बँक शाखेच्या दरवाजाची कडीकोयंडा चोरट्यांनी उचकटला होता.

जिल्हा बॅंकेची कुणकेश्‍वर
शाखा फोडण्याचा प्रयत्न
वीज नसल्याचा फायदा घेत तिजोरीपर्यंत मजल

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः तालुक्यातील विद्युतपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत जिल्हा बँकेच्या कुणकेश्‍वर शाखेत डल्ला मारण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला. सुरक्षा दरवाजा आणि आतील दरवाजाचा तोडून चोरट्यांनी तिजोरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यांना तिजोरी उघडता आली नाही. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. हा प्रकार आज सकाळी सुमारास निदर्शनास आला. या घटनेमुळे शाखेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता. २२) सायंकाळपासून तालुक्याचा वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. याचाच फायदा चोरट्यांनी घेत कुणकेश्‍वर शाखेच्या कार्यालय इमारतीच्या मुख्य दरवाजासमोरील लोखंडी ग्रील उचकटले. आतील मुख्य लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत शिरले. तिजोरी ठेवलेल्या ठिकाणचे लोखंडी ग्रील उचकटून काढले. आतील लाकडी दरवाजाचा उचकटला. तिजोरीचे हँडल तोडले. मात्र, प्रयत्न करूनही तिजोरी उघडली नाही. परिमाणी, चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. आजूबाजूच्या ग्रामस्थांना जाग येऊ नये, यासाठी चोरट्यांनी सायरनची जोडणी तोडली होती. बाजूच्या इमारतीच्या बाहेरील सीसीटीव्ही तोडले. आज सकाळी कार्यालयीन वेळेत बँक कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी पाहणी केली. याबाबत बँकेचे शाखाधिकारी मकरंद सक्रु यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार उदय शिरगावकर तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99208 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..