शरद पवार पुस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार पुस्तक
शरद पवार पुस्तक

शरद पवार पुस्तक

sakal_logo
By

47766

‘२, सिल्व्हर ओक’चे
शुक्रवारी होणार प्रकाशन
कोल्हापूर, ता. २३ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘२, सिल्व्हर ओक’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (ता. ३०) शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.
दत्ता पवार यांनी पुस्तक संपादित केले असून राज्यातील १०० मान्यवरांचे लेख पुस्तकात आहेत. दुर्गा पब्लिकेशन हाऊसच्या वतीने दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी महाराणा प्रताप चौकातील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महिला शहराध्यक्षा जहीदा मुजावर, ग्रामीण महिलाध्यक्षा शीतल फराकटे, सुनील देसाई, निरंजन कदम, फिरोज सरगुर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99210 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..