सोशल मीडीयावर बदनामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडीयावर बदनामी
सोशल मीडीयावर बदनामी

सोशल मीडीयावर बदनामी

sakal_logo
By

फोटो व्हायरल करून
त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा
कोल्हापूर ः सोशल मीडियावर महिलेचे व तिच्या मुलीचे फोटो व्हायरल करून आणि सतत फोन करून त्रास दिल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद केला. हा प्रकार २०२१ आणि २२ सप्टेंबर २०२२ मध्ये घडल्याची फिर्याद संबंधित महिलेने दिली असून संशयिताचा मोबाईल क्रमांका आधारे पोलिस शोध घेत आहेत.

१२ लाख ७० हजारांची फसवणूक
कोल्हापूर ः चांगल्या परताव्याच्या आमिषाने १२ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद केला. अभिजित धोंडीबा सावंत, शीतल अभिजित सावंत, अर्चना माधव स्वामी अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती, विक्रमनगर येथील एका महिलेस संशयितांनी चांगला परतावा देण्याच्या अमिषाने त्याच्या ट्रेडिंग कंपनीमध्ये १६ लाख ५० हजार रूपये गुंतविण्यास भाग पाडले. त्यातील केवळ ३ लाख ८० हाजार रुपये परतावा देऊन उर्वरित १२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२० अखेर घडल्याची फिर्याद संबंधित महिलेने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99215 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..