डॉ. लवटे कार्य चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. लवटे कार्य चर्चा
डॉ. लवटे कार्य चर्चा

डॉ. लवटे कार्य चर्चा

sakal_logo
By

५२१७१

डॉ. लवटेंचे कार्य नव्या पिढीसाठी वैचारिक जागर
---
डॉ. राजेखान शानेदिवाण; डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या जीवनकार्याचे उलगडले पदर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः ‘‘नव्या काळात आपण अनेक छोट्या गोष्टींवरून नाराज होतो. मात्र, डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यांच्या आयुष्यात सहन केले, सोसले आणि चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. असे सूत्र घेऊनच त्यांनी विविध क्षेत्रांत आत्मीयतेने कार्य केले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रवास ‘अनोन ते टू वेलनोन’ असा घडला. त्याच्या छटा ‘खाली जमीन, वर आकाश’ या त्यांच्या आत्मकथनात वाचायला मिळतात. डॉ. लवटे यांच्या जगण्याचा हा प्रवास नव्या पिढीसाठी वैचारिक जागर ठरावा,’’ असे मत प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी आज व्यक्त केले. शाहू स्मारक भवनात भाग्यश्री प्रकाशन, अक्षर दालन व निर्मिती प्रकाशनतर्फे डॉ. सुनीलकुमार लवटे जीवनकार्य या विषयावरील चर्चेत ते बोलत होते.
प्रा. डॉ. विश्वास सुतार म्हणाले, ‘‘डॉ. लवटे यांच्या जगण्याचा प्रवास वेदना सोसतच पंढरपूरच्या आश्रमातून सुरू झाला. तो कोल्हापूरपर्यंत आला. शिक्षण व वाचनातून त्यांची वैचारिक जडणघडण होत गेली. त्यांच्यातील संवेदनशीलता, विवेकाचा दृष्टिकोन विस्तारला. महात्मा गांधी, पूज्य साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, वि. स. खांडेकर आदींच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते लेखन, शिक्षण, सामाजिक कार्यात मग्न झाले. हिंदी, मराठी भाषांचा अनुबंध जोडण्याचे कार्य त्यांनी केले, त्याची उत्तर प्रदेश सरकारने दखल घेत त्यांचा सन्मान केला, असा डॉ. लवटे यांचा संपूर्ण प्रवास १२ प्रकारांत वर्गीकरण करून ग्रंथ तयार होत आहे.’’
मिलिंद यादव म्हणाले, ‘‘एखाद्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तीचा सत्कार करणे ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरकरांतर्फे ९ ऑक्टोबरला डॉ. लवटे यांचा नागरी सत्कार होत आहे.’’
डॉ. जी. पी. माळी, सी. एम. गायकवाड, अनिल म्हमाणे, जॉर्ज क्रूझ यांनी डॉ. लवटे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
---
डॉ. लवटेंच्या कार्यावर सहा नवे ग्रंथ
‘‘मानवी जगण्याला विवेकाचे शिक्षण आणि शहाणपणाची जोड असावी लागते, असा उद्देश घेऊन डॉ. लवटे यांनी लेखन व आचरण केले. भावना व मूल्यांचा समतोल राखला म्हणून त्यांच्या कार्याचे अनेक पैलू अनेकांच्या मानला भावतात. हे त्यांच्या कर्तृत्वाचे वेगळेपण आहे. त्याच्या विविध छटा असलेले सहा ग्रंथ त्यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने प्रकाशित होणार आहेत,’’ असेही श्री. सुतार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99232 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..