प्रा. डॉ. रूपा शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. डॉ. रूपा शहा
प्रा. डॉ. रूपा शहा

प्रा. डॉ. रूपा शहा

sakal_logo
By

52291

एनसीसी राष्ट्राभिमानाची वृत्ती रुजविते ः डॉ. शहा
कोल्हापूर, ता. २५ : ‘साने गुरुजींनी जात, धर्म यापलीकडे जाऊन भारतीयत्व आणि मानवतेचे संस्कार नव्या पिढीत रुजविण्याचे प्रयत्न केले आणि राष्ट्रीय छात्र सेनाही याच विचारांसह व्यक्तिमत्त्व विकास घडवून राष्ट्रासाठी समर्पित होण्याची भावना मुला-मुलींमध्ये रुजविते,’ असे राष्ट्रीय छात्र सेनेच्या ऑनररी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा यांनी सांगितले. गडहिंग्लज येथील साधना हायस्कूलमध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीच्या दुसऱ्या बॅचचा निरोप समारंभ झाला. या वेळी त्या बोलत होत्या.
डॉ. शहा यांनी एनसीसी प्रशिक्षणामुळे मिळणाऱ्या करिअरच्या संधी, प्रशिक्षणामुळे विकसित होणारे नेतृत्वगुण तसेच आयुष्यातील कठीण प्रसंगांनाही सामोरे जाऊन यशस्वी होण्याची निर्माण होणारी क्षमता याविषयी माहिती देऊन हे प्रशिक्षण प्रत्यक्ष जीवनात आणि वैवाहिक आयुष्यातही उपयुक्त ठरू शकते, हे स्पष्ट केले. सृष्टी पाटगावे, विश्रांती चौगुले, संयमी पाटील, दर्शना शहा यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य जी. एस. शिंदे, उज्ज्वला दळवी, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली भिऊंगडे, गर्ल्स एनसीसीच्या सीटीओ गीता नातलेकर उपस्थित होत्या.