गडहिग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

52397
गिजवणे : ग्रामपंचायतीतर्फे डस्टबीनचे वितरण करताना सतीश पाटील, पौर्णिमा कांबळे, नितीन पाटील, अदित्य पाटील, लक्ष्मण शिंदे आदी.

गिजवणे ग्रामपंचायतीतर्फे डस्टबीन वाटप
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीकडून डस्टबीनचे वाटप करण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगातून ही डस्टबीन देण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे वितरण झाले. पाटील म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीने गतवर्षी घंटागाडी खरेदी केली. पण, सर्वसामान्य नागरिकांकडे घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी डस्टबीन नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ही गरज ओळखून डस्टबीन देण्यात आली आहेत.’’ उपसरपंच नितीन पाटील, सदस्य आदित्य पाटील यांचीही भाषणे झाली. सरपंच पौर्णिमा कांबळे, सदस्य लक्ष्मण शिंदे, प्रशांत कुंभार, भुषण गायकवाड, अमित देसाई, शिल्पा पाटील, वर्षा पाटील, शशिकला पोडजाळे, स्नेहल दळवी, अन्नपूर्णा नाईक, सुगंधा कुंभार, ग्रामविकास अधिकारी अर्जुन रेडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष चव्हाण यांनी आभार मानले.
-----------------
घाळीत ‘वायसीएमयू’चा अभ्यासक्रम
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात प्रथम मुक्त विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. घाळीत त्यासोबत बी. ए., बी. कॉम व ग्रंथालयशास्त्र हे अभ्यासक्रम सुरू आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, केंद्र संयोजक प्रा. प्रवीण माळी, प्रा. राजेंद्र सावेकर यांनी केले आहे.
-----------------
‘साधना’मध्ये पाककला प्रदर्शन
गडहिंग्लज : येथील साधना प्रशालेत पोषण आहार सप्ताहानिमित्त पाककला प्रदर्शन व स्पर्धा झाली. डॉ. अनुप बारदेस्कर, डॉ. रोशनी बारदेस्कर, अनिता डिसोझा यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. प्रदर्शनात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी ६५ स्टॉल मांडण्यात आले होते. शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे हे स्टॉल होते. अरविंद बारदेस्कर, रवींद्र पोतदार, शीतल हरळीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. अनिश येसादे, इशिका घारवे, अक्षरा जाधव, नीदा दरवाजकर, तनिष्‍का शिवणे, सोहा केसरकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. पोषण आहार प्रमुख सतीश कांबळे, अमोल शेडबाळे, जॉन्सन सोज, शीतल भवारी यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक जी. एस. शिंदे, रफिक पटेल, राकेश हिरेमठ, रमन लोहार आदी उपस्थित होते.
-----------------
घाळी महाविद्यालयात कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कार्यक्रम झाला. हिरण्यकेशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. नीलेश शेळके यांनी स्वागत केले. चौगुले म्हणाले, ‘‘सामाजिक कार्यासाठी पैशापेक्षा वेळ देणे महत्त्‍वाचे असते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्राचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी जबाबदारीने वागले पाहिजे.’’ डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्‍व व महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष बाबर यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. डॉ. दत्तात्रय वाघमारे यांनी आभार मानले.