अहिल्यादेवी पतसंस्थेतर्फे १२ टक्के लाभांश ः पुजारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी पतसंस्थेतर्फे १२ टक्के लाभांश ः पुजारी
अहिल्यादेवी पतसंस्थेतर्फे १२ टक्के लाभांश ः पुजारी

अहिल्यादेवी पतसंस्थेतर्फे १२ टक्के लाभांश ः पुजारी

sakal_logo
By

52411

अहिल्यादेवी पतसंस्थेतर्फे
१२ टक्के लाभांश ः पुजारी
इचलकरंजी, ता.२५ ः हातकणंगले तालुका अहिल्यादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष नागेश पुजारी यांनी केली. संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. त्यांनी प्रास्तविक व अहवाल वाचन केले. संस्थेला अहवाल सालात १५ लाखाचा नफा झाला आहे. संस्थेकडे ९ कोटी ४२ लाखांच्या ठेवी आहेत. ७ कोटी ५३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जदार सभासद हितासाठी अहिल्या सुरक्षा कवच निधी योजना, अहिल्या बचत योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुजारी यांनी केले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणीकेचे वाचन केले. गुणवंत विद्यार्थ्यांसह शासकीय सेवेत रुजू झालेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार केला. सेक्रेटरी रायगोंडा पुजारी यांनी नोटीस वाचन केले. संचालक दत्तात्रय कुंभोजे, कल्लाप्पा गावडे, सोमाजी वाकसे, श्रीपती माने, चंद्रकांत आवळे, बाळासो घोदे, दत्तात्रय धनगर, निलम आरगे, यल्लाप्पा लंगोटे, सखाराम गावडे, मनगू गावडे, शामराव अनुसे, शिवाजी कारंडे आदी उपस्थीत होते. उपाध्यक्ष संतोष लंगोटे यांनी स्वागत केले. चंद्रकांत आवळे यांनी आभार मानले. गायत्री आरगे व प्रविण लवटे यांनी सुत्रसंचालन केले.