रोझरी ज्युनिअर कॉलेजचा पायाभरणी समारंभ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोझरी ज्युनिअर कॉलेजचा पायाभरणी समारंभ उत्साहात
रोझरी ज्युनिअर कॉलेजचा पायाभरणी समारंभ उत्साहात

रोझरी ज्युनिअर कॉलेजचा पायाभरणी समारंभ उत्साहात

sakal_logo
By

52482
आजरा : येथील रोझरी ज्युनिअर कॉलेजची पायाभरणी सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महागुरू अल्विन बरेटो करताना. या वेळी प्राचार्य फादर फेलिक्स लोबो, अल्बर्ट डिसोझा व अन्य मान्यवर.

रोझरी ज्युनिअर कॉलेजचा
पायाभरणी समारंभ उत्साहात
आजरा, ता. २५ : रोझरी इंग्लिश स्कूल सलग्न रोझरी ज्युनिअर कॉलेजच्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी प्रारंभ उत्साहात झाला. सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महागुरू अल्विन बरेटो यांच्या हस्ते प्रारंभ झाला. आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, पंचायत समितीच्या माजी सभापती रचना होलम, आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, कारखान्याचे संचालक जनार्दन टोपले, सुधीर देसाई, डॉ. श्रद्धानंद ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष महागुरू बरेटो म्हणाले, ‘‘शिक्षणासोबतच सदाचार, शिष्टाचार ही मुले रुजवून देशाचे चांगले नागरिक बनवण्याची जबाबदारी ही शिक्षण संस्थांची आहे. रोझरीचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर काम करीत आहेत. त्यामुळे रोझरीचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे.’’ डॉ. ठाकूर म्हणाले, ‘‘माजी विद्यार्थांच्या सहकार्यातून इमारतीचे काम मार्गी लागेल. एक चांगले शैक्षणिक संकुल उभारेल.’’ चंद्रमणी म्हणाले, ‘‘ही शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरीही जिल्ह्यात नामवंत व आदर्शवत आहे. शाळेची गुणवत्ता कायम राखून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.’’ कार्यक्रमासाठी प्राचार्य फादर फेलिक्स लोबो, मॅनेजर फादर यांचे मार्गदर्शन कॅजिटन रॉड्रिक्स यांचे प्रोत्साहन मिळाले.