
दांडिया कार्यक्रम
रास दांडिया कार्यक्रम,
स्पर्धांची रेलचेल
कोल्हापूर, ता. २५ ः कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या निर्बंधमुक्त नवरात्रोत्सवात शहरात विविध ठिकाणी ‘रास दांडिया’ कार्यक्रम, स्पर्धांची रेलचेल असणार आहे. शहरातील विविध संस्था, संघटनांकडून दांडिया स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवरात्रीतील वेगवेगळ्या दिवशी हे कार्यक्रम असल्याने दांडिया रसिकांना, स्पर्धकांना ‘रास - दांडिया’ खेळण्याची पर्वणीच मिळणार आहे.
गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात रंगणाऱ्या गरबा आणि दांडिया या नृत्यप्रकारांना अनुभवण्याची व मित्र-मैत्रिणींसह ते मनसोक्त खेळण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. सोमवारी (ता. २६) हॉटेल अयोध्या येथे सायंकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिजेटतर्फे रास गरबाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. २९) जैन सोशल ग्रुपतर्फे महासैनिक दरबार हॉल येथे रास दांडियाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. ३०) रोटरी क्लबतर्फे महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘रास गरबा’चे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १) हॉटेल सयाजी, रेसिडेन्सी क्लबमध्ये रास दांडियाचा मेगा इंव्हेट आयोजित केला आहे. रविवारी (ता. २) महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे विशाल गडकर कपांऊड, नागाळा पार्क येथे दांडिया स्पर्धा आयोजित केल्या आहेत.