शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण
शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण

शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

52492
------------
शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण
इचलकरंजी, ता. २५ : येथील आपटे वाचन मंदिर येथे शिक्षक गौरव पुरस्कार समारंभ झाला. यामध्ये पूर्व प्राथमिक विभाग- प्रीती भूपाल मोकाशी (रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन), प्राथमिक विभाग- सरिता शिवाजी पाटील (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर), माध्यमिक विभाग - पी. डी. शिंदे (सरस्वती हायस्कूल), उच्च माध्यमिक विभाग -अनिसा सिकंदर काजी (गोविंदराव ज्युनिअर कॉलेज), महाविद्यालयीन विभाग- डॉ. संजय आण्णासो खोत (शरद इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरवले.
डॉ. रणधीर शिंदे यांनी बदलती शिक्षण पद्धती, आदर्श गुरू शिष्य, आजची शिक्षक व विद्यार्थ्यांची जबाबदारी याविषयी उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
वाचनालयाच्या अध्यक्षा सुषमा दातार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची ओळख मीनाक्षी तंगडी, राजेंद्र घोडके, मोहन पुजारी व काशिनाथ जगदाळे यांनी करून दिला.