टाकाळा खण स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाळा खण स्वच्छता
टाकाळा खण स्वच्छता

टाकाळा खण स्वच्छता

sakal_logo
By

52495

टाकाळा तलावाची
मनपाकडून स्वच्छता

कोल्हापूर, ता. २५ ः महापालिकेच्यावतीने टाकाळा तलावाची (त्रिकाल तीर्थ) स्वच्छता करून चार डंपर केंदाळ काढले. जेसीबी, डंपर, औषध फवारणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोहीम राबवली.
उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी आज टाकाळा तलाव, अंबाबाई मंदिर, मेन राजाराम हायस्कूल पटांगण, एम.एल.जी. हायस्कूल पटांगण, पेटाळा-पद्ममाराजे गर्ल्स हायस्कूल, गांधी मैदान, शिवाजी स्टेडियम, दसरा चौक, पंचगंगा नदी घाट, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी, प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, डॉ. झाकीर हुसेन शाळा, सुसुरबाग, शाहू स्टेडियम पूर्व बाजू, निर्माण चौक, संभाजीनगर, बिंदू चौक, गाडी अड्डा आदी पार्किंग ठिकाणांच्या स्वच्छतेची पाहणी केली. मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, उप शहर अभियंता बाबूराव दबडे, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते‌.