केसरकर राजकीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकर राजकीय
केसरकर राजकीय

केसरकर राजकीय

sakal_logo
By

प्रकल्प कोणामुळे गेला याचे रेकॉर्ड देऊ
...................
मंत्री दीपक केसरकर ः दोन वर्षे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाकडे कोणी दुर्लक्ष केले
..............
कोल्हापूर, ता. २५ ः वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आमच्यामुळे बाहेर गेला, असा आरोप जे करत आहेत, त्यांच्यासाठी रेकॉर्ड जाहीर करायला आम्ही तयार आहे, असा इशारा देतानाच ज्यांनी दोन वर्षे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले ते जबाबदारी स्वीकारत नाहीत, असा आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, अरब देशातील राजपुत्र, मोठ्या बँकांचे प्रतिनिधी मुंबईत आले होते. मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना या सर्वांना अर्धा तास भेट देण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी उद्योगमंत्र्यांची भेट घ्यायला सांगितले. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे, असा गौप्यस्फोटही श्री. केसरकर यांनी केला.
भाजप व सेनेला जोडणारा मी दुवा आहे, असे सांगून श्री. केसरकर म्हणाले, ‘शिवसेना ही आमचीच आहे, कट्टर शिवसैनिक याचे राजकारण करणार नाहीत.’
मी त्या शिवसैनिकांशी चर्चा करायला तयार आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहावी, यासाठी माझा प्रयत्न आहे.’
दसरा मेळाव्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे; पण याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत नाही. काल निकाल लागल्यानंतर कशा पद्धतीने जल्लोष केला, हे सगळ्यांनी पाहिले. कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असे कोर्टाने सांगितले होते; पण काल कसे चिडवले हे पाहिले. आम्ही कुणाला चिडवलं नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोनं लुटणार आहोत.
श्री. केसरकर यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आदित्य ठाकरे मंत्रालयात कार्यालयात किती वेळा गेले हे जाहीर करावे.
जे कार्यालयात जाऊ शकले नाहीत, ते इन्वेस्टमेंट काय आणणार?, प्रकल्प कसे आणायचे आम्हाला चांगले माहिती आहे. ज्यांनी काल सभा घेतली, त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री असताना हाय पॉवर कमिटी मीटिंग घ्यायला का भाग पाडले नाही. आदित्य ठाकरे खोटं बोलून महाराष्ट्रभर फिरत असतील, तर ही ग्लोबल नीती आहे. शंभर वेळा खोटं बोलण्याचं पाप आज महाराष्ट्रात घडतंय.
-

दप्तराचे ओझे कमी केले
श्री. केसरकर म्हणाले, ‘६४ कोटींची सबमरीन मी जाहीर केली होती, त्याबद्दल आदित्य ठाकरे काहीही करू शकले नाहीत. तुम्हाला पर्यटन आणि उद्योगावर बोलायचे काय अधिकार? तुम्ही खोटं सांगत असाल, तर आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रभर फिरावे लागले, असेही श्री. केसरकर म्हणाले. शिक्षणासंबंधी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. दप्तराचे ओझे कमी केले आहे. पुढच्या वर्षीपासून सर्वांना मोफत वह्या देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
..............