खेडे येथे रोगनिदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडे येथे रोगनिदान शिबीर
खेडे येथे रोगनिदान शिबीर

खेडे येथे रोगनिदान शिबीर

sakal_logo
By

52534
खेडे (ता. आजरा) : येथे रोगनिदान शिबिरात रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

खेडे येथे रोगनिदान शिबिर
आजरा : खेडे (ता. आजरा) येथे डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन कोल्हापूर संचालित ग्रामीण शाश्‍वत विकास प्रकल्पाअंतर्गत मोफत रोगनिदान शिबिर झाले. (कै.) माधवराव देशपांडे यांच्या परिवाराचे सहकार्य लाभले. या वेळी १२१ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. कोल्हापूर येथील डॉ. विद्या वाघ, डॉ. सिध्देश्‍वर इनामदार व सहायक संगीता कांबळे, तन्वी कुडाळकर यांनी तपासणी केली. उपवासाचे पदार्थ कसे करावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शकुंतला धकर व कोमल औंधकर यांनी पाककला कृती प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये साबुदाणा लाडू, उपवासाचे इडली वडा, चिरडे, गुलाब जामून, वरीचा शिरा हे पदार्थ तयार करण्यात आले. दि. आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे म्हणाले, ‘‘भविष्यामध्ये गावात विविध उपक्रम राबविले जातील. ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.’’ या वेळी व्ही. टी. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर, अंजनी देशपांडे, मिलन होळनकर, डॉ. संदीप देशपांडे यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला. शिबिरासाठी उपसरपंच चव्हाण व शालेय समितीचे सहकार्य लाभले.