
निधन वृत्त
52539
डॉ. वैशाली सोनवणे
कोल्हापूर : प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वैशाली शंकरराव सोनवणे (वय ४४) यांचे निधन झाले. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांची काल शस्त्रक्रिया झाली होती. परवडी (ता. बारामती, जि. पुणे) या त्यांच्या मूळ गावी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई-वडील, दोन बहिणी, पती, मुलगा असा परिवार आहे. एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर त्यांनी नेत्ररोगासंबंधी डी.ओ.एम.एसपर्यंत शिक्षण घेतले. गेली काही वर्षे खासबाग येथे त्यांनी स्वतंत्र रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा दिली. त्यांचे पार्थिव सकाळी राजारामपुरी सहाव्या गल्लीतील रजनी टेरेस येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यांचे पती शंकरराव सोनवणे हे वेगवेगळ्या वृत्तपत्रातील जाहिरात विभागाच्या माध्यमातून परिचित आहेत.
52541
शांताबाई चौगुले
कोल्हापूर : सुरूपली (ता. कागल) येथील शांताबाई श्रीपती चौगुले (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २६) आहे.
52543
राधा पिसे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, पोतनीस बोळ येथील राधा मुकुंद पिसे (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.