जनता गृतारण संस्थेला २१ लाख ५४ हजार नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता गृतारण संस्थेला २१ लाख ५४ हजार नफा
जनता गृतारण संस्थेला २१ लाख ५४ हजार नफा

जनता गृतारण संस्थेला २१ लाख ५४ हजार नफा

sakal_logo
By

52680
आजरा : जनता गृहतारण संस्थेच्या सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे व अन्य मान्यवर.

जनता गृहतारण संस्थेला
२१ लाख ५४ हजार नफा
मारुती मोरे; सभासदांना ११ टक्के लाभांश
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २७ : संस्थेला या आर्थिक वर्षात २१ लाख ५४ हजार १७६ इतका निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना ११ टक्के लाभांश दिला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली.
येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेची २१ वी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून मोरे बोलत होते. त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेची आर्थिक स्थिती मांडली. या वेळी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेले, निवृत्त सभासद, विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अहवालाचे मुखपृष्ठ उत्तम केल्याबद्दल आनंद बल्लाळ यांचे कौतुक करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापक मधुकर खवरे यांनी विविध पत्रकांचे वाचन केले. मोरे म्हणाले, ‘‘संस्थेकडे ६१ कोटी ७६ लाखांपर्यंत ठेवी आहेत. ३५ कोटी ४३ लाखांच्या कर्जाचे वाटप केले आहे.’’ या वेळी झालेल्या चर्चेत आनंद व्हसकोटी, इनास फर्नांडिस यासह सभासदांनी सहभाग घेतला. आजरा शाखेचे उपाध्यक्ष व्ही. जी. अरळगुंडकर, संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देशपांडे, प्रा. डॉ. तानाजी कवाळे, अॅड. सुभाष डोंगरे, डॉ. अंजनी देशपांडे, प्रा. लता शेटे, नेहा पेडणेकर उपस्थित होते. प्रा. विनायक चव्हाण व प्रा. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.