जादूगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जादूगार
जादूगार

जादूगार

sakal_logo
By

52459

जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे
आज जादूचे प्रयोग
कोल्हापूर ः जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग सोमवारी (ता. २६) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता प्रयोग होईल. कुटुंबांसाठी सुरक्षित ‘मायाजाल’ हे जादूचे प्रयोग प्रदीर्घ कालावधीनंतर येथे अनुभवता येणार आहेत. जादूगार रघुवीर-विजय-जितेंद्र रघुवीर पिता-पुत्रांचा हा विक्रमी १५ हजार ८२१ वा प्रयोग आहे. दोन वर्षात सर्वच जादूगार व पडद्यामागच्या कलाकारांना आर्थिक व मानसिक स्तरावर संघर्ष करावा लागला.
या पार्श्वभूमीवर ‘ना नफा, ना तोटा’ या धर्तीवर हे प्रयोग होत असून शालेय विद्यार्थ्यांना तिकिटामागे शंभर रुपयांची सवलत दिली जाणार आहे. आक्राळविक्राळ जापनीज डायनासोरबरोरची लढत, भूतांचा नाट, दोन तुकडे करून परत जोडणे, मायक्रोवेव्ह मॅजिक, रिंग ओ मॅजिक, स्वार्ड कॅबिनेट तसेच शून्यातून विश्वनिर्मिती, आर्म इल्युजन, हुदिनी बॉक्स, ट्यूब झ्याक, प्रेक्षकातील मुलगी हवेत अधांतरी, नोटांचा पाऊस, फ्रेंच गुईलोटीन, स्टेजवरचा माणूस क्षणार्धात गायब, मास्टर ऑफ प्रेडिक्शन असे अनेक जादूंचे नजराणे प्रयोगातून सादर होणार आहे. अडीच तासांच्या प्रयोगात ५० इजिप्शियन, अमेरिकन, जापनीज, ॲरेबिक जादूंच्या प्रयोगांचा समावेश असेल.