
आत्मदहनाचा इशारा
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या
निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा
कोल्हापूर, ता. २५ ः रस्त्याने बाधित होऊनही विस्थापित म्हणून जागा देण्याच्या कामात महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर अडथळा आणल्याच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस दत्ताजीराव वाझे मंगळवारपासून (ता. २७) पाच दिवसांचे धरणे आंदोलन करणार आहेत. या दिवसांत निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरला आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.
महापालिकेतील उद्धट उत्तरे, चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे, वरिष्ठांचे आदेश धुडकावणे, नागरिकांना फेऱ्या मारायला लावणे अशा वृत्तीविरोधात आंदोलन करत आहे. तत्कालिन मुख्य अग्निशमन अधिकारी, अतिरिक्त आयुक्त तसेच सध्याचे इस्टेट ऑफिसर या तीन अधिकाऱ्यांमुळे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान झाले आहे.२००४ पासून महापालिकेत हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने या प्रवृत्तीला कंटाळून आत्मदहन करणार असल्याचे वाझे यांनी पत्रकात म्हटले आहे.