भजन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भजन स्पर्धा
भजन स्पर्धा

भजन स्पर्धा

sakal_logo
By

शिवाजी चौकात आजपासून
सोंगी भजन स्पर्धा
कोल्हापूर, ता. २५ : शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे नवरात्र उत्सव सोंगी भजन स्पर्धांना उद्या सोमवार (ता. २६) पासून सुरू होत आहेत. उद्योगपती बसवराज आजरी व आशिष अंगडी यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता या स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी देवीचा जागर, होम हवन, आतषबाजी असे कार्यक्रम होतील. त्यानंतर दररोज रात्री आठ वाजता भजन स्पर्धा होतील, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष पोपट मुसळे यांनी दिली आहे.
स्पर्धेतील सहभागी भजनी मंडळे अशी :
सोमवार - ओंकार गजानन सोंगी भजन मंडळ (कोल्हापूर), मंगळवार - गुरुमाऊली सोंगी भजन (दिंडनेर्ली) बुधवार - रामकृष्ण हरी सोंगी भजन (गडमुडशिंगी), गुरुवार - विठ्ठल पंथी सोंगी भजन (आरेगाव), शुक्रवार - विठू माऊली संगीत भजन (महे), शनिवार - ओमगणेश भजन (कंदलगाव), रविवार - सद्‌‌गुरू भजनी मंडळ (कंदलगाव), सोमवार - विठ्ठल पंथी कला, क्रीडा, सांस्कृतिक भजनी मंडळ (दुर्गळवाडी), मंगळवार - विठ्ठल प्रासादिक सोंगी भजन (बुजवडे).