गांजा कारवाई बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा कारवाई बातमी
गांजा कारवाई बातमी

गांजा कारवाई बातमी

sakal_logo
By

52568
52569
52570
शाहूपुरीत ७ किलो गांजा जप्त
३ जणांना अटक, रॅकेटची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शाहूपुरीतील हॉटेलच्या बेसमेंटमधील एका दुकानात पोलिसांनी छापा टाकून ७ किलो ८९५ ग्रॅम गांजा जप्त केला. शहरात विक्री करण्यासाठी हा गांजा आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याप्रकरणी ३ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गांजा आणि मोबाईल असा सुमारे २ लाख २७ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरीमधील एका हॉटेलच्या तळमजल्यावर फिश वल्ड अँड पेट शॉप आहे. या ठिकाणी गांजा असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यांनी माहितीची खात्री करून शनिवारी (ता.२४) संध्याकाळी येथे छापा टाकला. यावेळी येथे ७ किलो ८९५ ग्रॅम गांजा मिळाला. याप्रकरणी मन्सूर मुनीर शेख (वय ३७, रा.३५१, ई वॉर्ड, स्टेशन रोड शाहूपुरी), रोहीत मनोज चव्हाण (वय २३, रा.जागृतीनगर), प्रथमेश विजय डबाणे (वय २४, रा.लाईन बाजार क. बावडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्याकडून गांजा कोठून आणला, त्याची विक्री कोठे होणार होती, याची माहिती पोलिस घेत आहेत. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.