लसणाचा भाव सावरू लागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसणाचा भाव सावरू लागला
लसणाचा भाव सावरू लागला

लसणाचा भाव सावरू लागला

sakal_logo
By

72441
गडहिंग्लज : आठवडा बाजारात लसूण खरेदी करताना ग्राहक. (आशपाक किल्लेदार ः सकाळ छायाचित्रसेवा)

भाज्यांची आवक वाढली; दर उतरले
---
लसूण सावरू लागले; संत्री, पेरूचे दर टिकून, इंदूर बटाट्याची नवी आवक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : भाजी मंडईत पालेभाज्या, कोंथिबिरीची मागणीपेक्षा अधिक आवक झाल्याने दर उतरले आहेत. सहा महिन्यांपासून घसरलेल्या लसणाचा भाव आवक कमी झाल्याने सावरू लागला. किलोमागे पाच ते दहा रुपयांनी दर वधारले आहेत. इंदूर बटाट्याची नवी आवक सुरू झाली. फळ बाजारात संत्री, पेरूचे दर टिकून आहेत.
लसणाची मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान येथून आवक होत असते. सहा महिन्यांपासून आवक वाढल्याने दर घसरले होते. परिणामी, किलोच्या दरात दोन किलो लसूण घ्या, अशी ग्राहकाला विनवणी करण्याची वेळ विक्रेत्यावर आली होती. गेल्या आठवड्यापासून आवक कमी होऊ लागल्याने दर सावरू लागले आहेत. घाऊक बाजारात क्विंवटलमागे ५०० ते ८०० रुपयांनी दर वधारले आहेत. क्विंटलचा २५०० ते ६५०० रुपये असा भाव आहे. किरकोळ बाजारात ४० ते १०० रुपये किलो असा दर्जानुसार दर आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत. विशेषतः इंदूर नव्या बटाट्याची आवक सुरू झाली आहे. इंदूर २००० ते २४००, तर आग्रा जुना २२०० ते २५०० रुपये क्विंवटल असा दर आहे. कांदे १२०० ते २५०० रुपये क्विंटल, तर किरकोळ बाजारात १५ ते ३० रुपये किलो आहेत.
फळ बाजारात नागपूर परिसरातील संत्री, सोलापुरी बोरांची आवक कायम आहे. संत्री, बोरे यांचा किलोचा दर ५० ते ६० रुपये आहे. थायलंडचा पेरू ८० ते १०० रुपये किलो आहे. डाळिंब, केरळचा तोतापुरी, किवी, ड्रॅगन फ्रूट १०० रुपये किलो
आहेत. भाजी मंडईत उसाच्या लावणीतील पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर कमी आहेत. शेपू, मेथी, पालक, कोंथिबिर यांच्या पेंढीचा दर चार ते पाच रुपये आहे. कोबी, टोमॅटो, प्लॉवर यांचे दर उतरलेलेच आहेत. गवार, वांगी, दोडका, कारली यांचे दर तेजीत आहेत. मटार, गाजराची आवक वाढली आहे.
--------------
चौकट
मटण मार्केट हाउसफुल्ल
काल (ता. ३१) वर्षाच्या समारोपासाठी समिष खवय्यांनी गर्दी केल्याने मटण मार्केटमध्ये विक्रमी उलाढाल झाली. आज रविवार आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी मटण मार्केटमध्ये गर्दी दिसली. समुद्रातील मच्छीलाही चांगली मागणी होती. विविध जातींनुसार २०० ते ८०० रुपयापर्यंत दर होते. चिकन २२०, तर मटण ६५० रुपये किलो होते.