लव्ह जिहाद विरोधात कायदा करा ः सुरेश चव्हाण के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लव्ह जिहाद विरोधात कायदा करा ः सुरेश चव्हाण के
लव्ह जिहाद विरोधात कायदा करा ः सुरेश चव्हाण के

लव्ह जिहाद विरोधात कायदा करा ः सुरेश चव्हाण के

sakal_logo
By

७२५७२

धर्मांतर विरोधी कायदा करा

सुरेश चव्हाण के; लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरात जनआक्रोश मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः देशामध्ये ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून हिंदू धर्मियांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा महाशिवरात्रीच्या आधी राज्य सरकारने केला पाहिजे; अन्यथा ‘चलो मुंबई’ असा मोर्चा आम्हाला काढावा लागेल, असा इशारा हिंदू नेते सुरेश चव्हाण के यांनी दिला. आज झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. गो हत्या बंदीच्या कायद्याचीही त्यांनी मागणी केली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचा समारोप भवानी मंडपाच्या बाहेर भाऊसिंगजी रस्त्यावर झाला. यावेळी सुरेश चव्हाण के यांनी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला संभाजी ऊर्फ बंडा साळोखे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘जनआक्रोश मोर्चाला परवानगी देऊ नका अशी मागणी काही संघटनांनी केली होती. मात्र, त्यांनी लव्ह जिहादचे वाढते प्रकार पाहावेत. इथून पुढे जो हिंदूंच्या हिताचा विचार करेल तोच राजकारणात टिकेल.’ नीळकंठ माने, राजश्री तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुरेश चव्हाण के म्हणाले, ‘देशामध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशाला जिहाद मुक्त करायचे आहे. यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा आणावा लागेल. लव्ह जिहादमध्ये मुलांना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जाते. काही वेळा या मुलांना बऱ्याच अत्याचारांना सामोरे जावे लागते. हे होऊ नये यासाठी कायदा केला गेला पाहिजे. तसेच हिंदूंनी सजग रहाण्याची आवश्यकता आहे. असे प्रकार जेथे दिसतील तेथे विरोध करणे आवश्यक आहे. लव्ह जिहादचा त्रास जगाच्या सर्वच भागात सुरू आहे. महाराष्‍ट्र सरकारने लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि गो हत्या यांच्याविरोधातील कायदे महाशिवरात्रीच्या आत केले पाहिजेत; अन्यथा चलो मुंबईचा नारा देऊन आम्ही मोर्चा काढू.’
---------------------------------------------------------------------------------
प्रमुख मागण्या
- लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो हत्या बंदी कायदा लागू करा
- गडकोटांवरील अतिक्रमण करून बांधलेली प्रार्थनास्थळे पाडा
- टिपू सुलतान जयंतीवर बंदी घाला
- दोन आपत्याचा कायदा करा
- जैन बांधवांच्या सम्मेद शिखरला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या
- देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा
-----------------------------------------------------
ते ‘अधर्मवीर’
यावेळी सुरेश चव्हाण के म्हणाले, छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने सर्व प्रकारची आमिषे दाखवली. मात्र, त्यांनी धर्म बदलण्यास नकार दिला. अखेर औरंगजेबाने संभाजीराजे यांची क्रूरपणे हत्या केली. धर्मासाठी बलिदान देणाऱ्या संभाजीराजांना ‘धर्मवीर’ न म्हणणे हा त्यांचा अवमान आहे आणि अवमान करणारे ते ‘अधर्मवीर’ आहेत.