
पतसंस्था
पतसंस्था, सहकारी बँकांसाठी
कार्यशाळा घ्यावीःस्मिता गवळी
कोल्हापूर, ता. २ जिल्ह्यातील पतसंस्था, को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी दोन ते चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन व्हावे. त्यासाठी सहकारी यंत्रणा सज्ज झाली पाहिजे,’’ असे केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम झाला गवळी म्हणाल्या, ‘‘सहकारी संस्था चालविणे सोपे नसून ते जिकरीचे काम आहे. समाजाच्या घामाचा पैसा विश्वासाने संस्थेने जपावे.’’
शिक्षण संचालक सर्जेराव जाधव म्हणाले, ‘ या संस्थेने आतापर्यंत पाच शाखा सुरु करून सर्व सामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या.’’ शिक्षणाधिकारी आशा उबाळे म्हणाल्या, ‘ ही संस्था कोवीड काळात स्थापन होऊन १८ कोटी ठेवीचा पल्ला गाठते. १८४ कोटींची उलाढाल करते. त्यामुळे पुढील वर्षाचे १०० कोटींचे टार्गेट नक्कीच पूर्ण करेल.’’
कांबळे म्हणाले, ‘‘ही संस्था ८० टक्के दुर्बल, वंचित समाजातील लोकांचे राहणीमान उंचावण्यास मदत करत आहे.’’
निवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. समरजित पाटील, भारत खराटे, वसुंधरा कदम, शंकरराव यादव, आनंदा आकुर्डेकर, मोहन पाटील, वनिता देठे, विश्वास सुतार, डी. ए. पाटील उपस्थित होते. मीना गारे, एम. एस. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.