महर्षी शिंदेंचे कार्य सर्वजनवादी; डॉ. सुनीलकुमार लवटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महर्षी शिंदेंचे कार्य सर्वजनवादी; डॉ. सुनीलकुमार लवटे
महर्षी शिंदेंचे कार्य सर्वजनवादी; डॉ. सुनीलकुमार लवटे

महर्षी शिंदेंचे कार्य सर्वजनवादी; डॉ. सुनीलकुमार लवटे

sakal_logo
By

72894
गडहिंग्लज : गुणवंत कर्मचारी पुरस्काराने नवनाथ दळवी यांना गौरविताना डॉ. सुनीलकुमार लवटे. शेजारी प्रा. किसनराव कुराडे, निरुपमा बन्ने, डॉ. अनिल कुराडे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे आदी.
...

महर्षी शिंदेंचे कार्य सर्वजनवादी

डॉ. सुनीलकुमार लवटे; ‘शिवराज’तर्फे कर्मवीर पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा विचार व्यापक होता. देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी मूलभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. महर्षी शिंदे हे कोणत्याही विशिष्ट पक्षाचे, जातीचे व धर्माचे उपासक नव्हते. म्हणूनच त्यांचे कार्य सर्वजनवादी होते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
शिवराज महाविद्यालयातर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कर्मवीर गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. डॉ. ए. एम. हसुरे यांना कर्मवीर गुणवंत शिक्षक, तर नवनाथ दळवी यांना कर्मवीर गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. अंधश्रद्धा व जटानिर्मूलनाचे कार्य करणाऱ्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचाही सत्कार झाला. राजेंद्र गड्ड्यान्नावर, निरुपमा बन्ने, उपाध्यक्ष प्रा. जे. वाय. बारदेस्कर, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लवटे म्हणाले, ‘भारतात अस्पृश्यता निवारणाचे कार्य महर्षी शिंदेंनीच पहिल्यांदा सुरू केले. सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे, अशी त्यांची विचार धारणा होती. इतिहासाचे जाणतेपणाने वाचन करून महर्षी शिंदे यांना समजावून घेण्याची गरज आहे.’
प्रा. किसनराव कुराडे यांनी कर्मवीरांच्या आदर्शाने संस्थेची वाटचाल सुरू असून नव्या पिढीला या समाजसुधारकांचे कार्य समजावे म्हणून त्यांच्या विचारांचा जागर सुरू केल्याचे सांगितले. डॉ. अनिल कुराडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. हसुरे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर आदी उपस्थित होते. प्रा. विश्वजित कुराडे यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एन. बी. एकीले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. तानाजी चौगुले, बियामा वाटंगी यांनी मानपत्रांचे वाचन केले. प्रा. अशोक मोरमारे, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. आशा पाटील यांनी सूत्रसंचाल केले. डॉ. आनंदा कुंभार यांनी आभार मानले.