गडहिंग्लजला क्रांतीज्योतींना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला क्रांतीज्योतींना अभिवादन
गडहिंग्लजला क्रांतीज्योतींना अभिवादन

गडहिंग्लजला क्रांतीज्योतींना अभिवादन

sakal_logo
By

73026
गडहिंग्लज : नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनप्रसंगी अधीक्षक भारती पाटील, जयवंत वरपे, संदीप कुपटे, विद्या कांबळे, मीनाक्षी मोळदी व बचत गटाच्या महिला.

गडहिंग्लजला क्रांतिज्योतींना अभिवादन
सावित्रीबाई फुले जयंती; विविध उपक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : गडहिंग्लज शहर आणि तालुक्यात विविध शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध उपक्रम व प्रतिमा पूजनाने त्यांना अभिवादन करण्यात आले.

डॉ. घाळी महाविद्यालय
डॉ. घाळी महाविद्यालयतील सचेतना मंडळातर्फे संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिपत्रिकेचे प्रकाशन झाले. प्राचार्य पाटील यांनी मार्गदर्शन केले. शुभांगी घाडेकर हिने मनोगत व्यक्त केले. बालिका दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींचा गौरव डॉ. सरला ओरबोळे, डॉ. सरोज बीडकर यांच्या हस्ते झाला. पल्लवी पोवार, नम्रता तुपूरवाडी आणि राखी नावलगी यांनी भित्तिपत्रिकेचे लेखन केले. प्रा. राजश्री पोरे यांनी स्वागत, तर सानिया चिटणीस हिने सूत्रसंचालन केले. निकीता मुन्नोळी यांनी आभार मानले.

शिवराज महाविद्यालय
शिवराज महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. या वेळी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते झाले. डॉ. आर. पी. हेंडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी स्वागत केले. प्रा. अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बिनादेवी कुराडे यांनी आभार मानले.

साधना महाविद्यालय
साधना महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक अरविंद बारदेस्कर व संजय घोडके यांच्या हस्ते झाले. समीक्षा कोरी व स्मित पाटोळे यांनी महिला मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या फुले यांच्या कार्याची माहिती दिली. बारदेस्कर यांचे भाषण झाले. राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थिनी मीनल मकानदार हिचा सत्कार झाला. कविता कोळेकर, शीतल हरळीकर, निलोफर शेख, बर्था फर्नांडिस, मनीषा पाटोळे यांनी नियोजन केले. पर्यवेक्षक आर. एन. पटेल, पी. के. हरेर, आर. सी. हिरेमठ, बी. एन. वाघमारे, विद्यार्थी उपस्थित होते. सुनीता नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

किलबिल विद्यामंदिर
किलबिल विद्यामंदिर व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांचे वेष परिधान करून मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक आनंदा घोलराखे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. संस्थाध्यक्षा अंजली हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती, शहजादी पटेल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मराठा मंदिर महाविद्यालय
मराठा मंदिर ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्समध्ये अभिवादन करण्यात आले. प्राचार्या सरिता भुईंबर अध्यक्षस्थानी होत्या. भुईंबर यांनी फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. नेहा पाटील, सानिका कुलकर्णी यांनी फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. प्रा. पल्लवी कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रेमा कोरी यांनी आभार मानले.

न्यू इंग्लिश स्कूल चन्नेकुप्पी
दुगूनवाडी : चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूटच्या महिला स्टाफ व शाळेच्या विद्यार्थिनींच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्ञानेश्‍वरी शेलार, पायल कोटगी, सी. बी. निकम यांनी भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. संजय माने यांनी आभार मानले.

क्रिएटिव्ह हायस्कूल
क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात संस्था सचिव अण्णासाहेब बेळगुद्री अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बेळगुद्री यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याची माहिती दिली. रायकर यांनी फुले यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेकविध पैलूंवर प्रकाश टाकला. सृष्टी कांडगळ, प्रणील कांबळे, सायली जाधव, नैतिक परीट यांनी मनोगत व्यक्त केले. शिवम पाटील याने स्वागत केले. वरद सुरंगे याने सूत्रसंचालन केले. आयुष बंदी याने आभार मानले.

साई मूकबधिर, गिजवणे
गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील साई मूकबधिर विद्यालयात बालिका दिन साजरा करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. शाळेतील सर्व मुलींना विविध खेळांचे आयोजन केले. खाऊचे वाटप झाले. सांस्कृतिक विभागाचे राजकुमार देवार्डे यांनी फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. मुख्याध्यापिका सरिता रजपूत उपस्थित होते. छाया काळे यांनी आभार मानले.

हलकर्णी परिसर
नूल : हलकर्णी परिसरात विविध उपक्रमांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. रेहान मुल्ला, आरोग्य सेविका राजश्री सूर्यवंशी, विना पाटोळे, परमेश्वर गायकवाड, संगीता नाईक उपस्थित होते. विद्या मंदिर गांधीनगरमध्ये फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाहीन मालदार यांच्या हस्ते झाले. चिमुकल्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांची लक्षवेधी वेशभूषा केली होती. या वेळी मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर, सुनीता जाधव, आरोग्य सेविका अर्चना शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. तेरणी येथील ए. आर. देसाई हायस्कूलमध्ये किशोरवयीन मुलींना आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांनी मार्गदर्शन केले.

झेप अकॅडमी गडहिंग्लज
येथील झेप अकॅडमीमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. प्राचार्या मीना रिंगणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. बंधनात अडकलेल्या कमकुवत स्त्रीला त्या काळात अलौलीक धैर्य दाखवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समता, मानवता, विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्राला खरा मार्ग दाखविला, असे मत रिंगणे यांनी व्यक्त केले. सायली बुगडे, साक्षी कल्याणकर, समुपदेशक विवेक दड्डी, संचालक रामचंद्र निळपणकर, रेखा पोतदार, उमा तोरगल्ली, मनोहर गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक महेश मजती, संदीप कागवाडे, रवळनाथचे सीईओ डी. के. मायदेव यांच्यासह प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्या देसाई हिने स्वागत, लक्ष्मी गुरव हिने सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन पाटील याने आभार मानले.

धामणे अंगणवाडीत कार्यक्रम
उत्तूर : धामणे (ता. आजरा) येथील अंगणवाडीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली. यानिमित्त श्री फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व ब्रश वाटप करण्यात आले. या वेळी अंगणवाडी सेविका अंजना कांबळे, वैशाली कांबळे, अश्विनी पाटील, संगीता इळके, श्री फाउंडेशनचे कार्येकर्ते एकनाथ पोटे, अमित गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.