कसोटी विवेकाची- श्रीराम पवार सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसोटी विवेकाची- श्रीराम पवार सर
कसोटी विवेकाची- श्रीराम पवार सर

कसोटी विवेकाची- श्रीराम पवार सर

sakal_logo
By

73001
...

विवेकी समाजासाठीच दाभोलकरांचे कार्य

श्रीराम पवार ः ‘कसोटी विवेकाची’ कला प्रदर्शनात मुक्त संवाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर विवेकी समाजासाठीच कार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी विज्ञानाचा आग्रह धरताना विविध प्रयोग आणि पर्यायांवर अधिक भर दिला. सध्याच्या काळात तर त्यांचे हे कार्य सर्वांनीच जाणून घ्यायला हवे. त्यासाठी ‘कसोटी विवेकाची’ या कला प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायला हवी, असे स्पष्ट मत आज ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व फ्रेंडस्‌ ऑफ दाभोलकर, विविध परिवर्तनादी संस्थांतर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर आधारित चित्र-शिल्प प्रदर्शनांतर्गत झालेल्या मुक्त संवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार होते.
संपादक संचालक श्रीराम पवार यांनी डॉ. दाभोलकर यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेतला. विविध आंदोलनावेळीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘सध्या जगभरातील व्यवस्था पहाता प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजेत किंबहुना व्यक्त व्हायलाच हवे. कारण एकूणच व्यवस्था नागरिकांच्या या स्वातंत्र्यावरच गदा आणू पहाते आहे. बहुसंख्यांकवाद, जाती-धर्मातील तेढ बळावत चालली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर डॉ. दाभोलकर यांचा विवेकी समाजासाठीचा विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरणार आहे.’
प्राचार्य डॉ. पोवार म्हणाले, ‘डॉ. दाभोलकर यांचे कार्य समाजातील सर्वच घटकांपर्यंत, विशेषतः तरुणाईपर्यंत पोचावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मुंबईनंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच हे प्रदर्शन होत असून त्याला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आणखी दोन दिवस या प्रदर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे.’’
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल चव्हाण यांनी स्वागत केले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील विविध अनुभव त्यांनी सांगितले. यावेळी बृहस्पती शिंदे, विलास वडणगेकर, मीना चव्हाण, सीमा पाटील, संजय सुळगावे आदी उपस्थित होते. राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालनात हे प्रदर्शन भरले आहे.