गड-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-संक्षिप्त
गड-संक्षिप्त

गड-संक्षिप्त

sakal_logo
By

नाथ पै शाळेत निवृत्त शिक्षकांचा गौरव
गडहिंग्लज : येथील बॅ. नाथ पै विद्यालयात नगरपरिषद शिक्षण मंडळाकडील निवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा गौरव झाला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित कांबळे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका सुवर्णा पोवार यांनी स्वागत केले. शंकर रणदिवे, गणपती येसरे, प्रकाश म्हेत्री, विलास जाधव, कमल इटी, आबेदा अत्तार, इरावती हत्ती, किस्मतबी अत्तार यांचा गौरव झाला. आबेदा अत्तार, इरावती हत्ती, प्रकाश म्हेत्री, विलास जाधव यांची भाषणे झाली. व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पूजा माने, अबोली मांडेकर उपस्थित होते. वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन, विष्णू बेनके यांनी आभार मानले.
----------------------------
नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील पालिकेच्या बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविले. इयत्ता सहावीच्या सिद्धी कांबळे, युवराज जाधव, ज्ञानेश वालीकर, गौरव मांडेकर, शर्वरी पाटील, आयुष चिंदके, स्मितेश चौगुले, वेदांत कांबळे, प्रतीक्षा कुंभार यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. विज्ञान शिक्षिका वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका सुवर्णा पोवार यांचे प्रोत्साहन लाभले.
--------------------------
gad41.jpg
73122
गडहिंग्लज : बालवैज्ञानिक परीक्षेत यश मिळविलेल्या शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक शिक्षक.

शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. शाळेचा 100 टक्के निकाल लागला. सात विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. राजवर्धन फडके, सुयश भोईट, ओंकार पाटील, सत्यम माने, स्वयंम कुंभार, दीपाली पाटील, मुहम्मदयुसूफ तांबोळी यांचा समावेश आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीपतराव शिंदे, मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचे प्रोत्साहन तर जे. एम. भदरगे यांचे मार्गदर्शन मिळाले.